या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. श्रीमंत बापूसाहेब कुरुंदवाडकर ह्यांचा आकस्मिक मृत्यु !! - हा बोलून चालून मृत्युलोक तर आहेच. परंतु कित्येक उदाहरणे इतकी शीघ्रगतिक आढळतात की, त्यांच्यापुढे चपलेचें चपलत्वही मंद पडेल. अशा प्रसंगी ऐहिक मनोविकार असा कांहीं खडबडून जागृत होतो की, जणों काय प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रत्यक्ष कालांतकानेंच येऊन धक्का दिला! असाच प्रकार श्री. बापूसाहेबांच्या संबंधाने झाला. श्रीमंतांची प्रकृति नित्याप्रमाणे चांगली खस्थतेत असून ते कुरुंदवाड येथे शनिवार ता० २९ जुलै १८९९ इ. रोजी रात्रौ भोजन करित असतां, ठसका लागल्याचे निमित्त होऊन त्यांनी खाली मस्तक टेंकलें. टेकलें तें टेंकलेंच! पुन्हा वर उठलेच नाहीत ! अशा प्रकारे मृत्यु येणे, हे मागे राहणाऱ्या इष्ट आप्तांस अत्यंत दुःखकारक, हे| तर सांगणे नकोच, पण कोणत्याही व्याधीशिवाय, कोणत्याही दुःखा शिवाय, क्षणमात्रही यातना सोसाव्या न लागतां मृत्यु येणे हे इहलोक सोडणाराचे मात्र महद्धाग्य समजले पाहिजे; व अशा माहात्म्याची पूर्वपुण्याई जबरदस्त असें झटल्यावांचून गत्यंतर नाही. - अंतकाल होण्यापूर्वी सुमारे चारच दिवस श्रीमंतांची स्वारी खतः आमच्या-'केरळकोकिळ'च्या-मुंबईच्या ऑफिसांत आली होती. ती| येवढ्याच करितां की, 'विविधज्ञानविस्तारांत' पंचवटीसंबंधाने | आलेल्या लेखास 'केरळकोकिळांतून प्रत्युत्तर येत आहे किंवा काय ? येणार असेल, तर आमांस उत्तर देणेची गरज नाही. नाही तर मला उत्तर तयार करणे भाग आहे; ह्या उद्देशाने. ह्यावर 'केरळकोकिळचे उत्तर तयार असून छापत आहे. ह्याकरितां श्रीमंतांनी तसदी घेण्याची आवश्यकता वाटत नाही," असे उत्तर मिळाल्यावर, श्रीमं