या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. गेलेच! श्री. बापूसाहेब हे शेवटचे श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांचे जामात होते. ह्मणजे ह्यांचा प्रथमचा विवाह ब्रह्मवर्तास झाला, व तें कुटुंब लौकरच निवर्तले. हल्लीचे श्रीमंतांचे कुटुंब श्रीमती जानकीबाई ह्या कवयित्री ह्या नात्याने प्रसिद्धच आहेत. त्यांजवर तर हा दुःखाचा पर्वत पडला आहे, त्यांतून पार पडण्यास त्यांस परमेश्वर सामर्थ्य देवो, व श्रीमंतांच्या आत्म्यास निरंतर आनंदांत ठेवो. श्रीमंतांचं सचित्र चरित्र, त्यांच्या स्वकीय जनांपैकी, कोणी दिल्यास, त्याचा 'केरळकोकिळांत' अत्यादराने समावेश केला जाईल. येवढी सूचना करून हा अल्पलेख पुरा करतो. पुन्हा पंचवटीस्थलनिर्णय. पर (पु० चालू.) ३ 'विविधज्ञानविस्तारा'चा भक्कम पुरावा,अपूर्व शोध, गहन विचार, निर्वाणीचे अस्त्र, असे जे रंघुवंशांतील निवडलेले दोन श्लोक ते ह्यांत आहेत. लोकांस ग्रंथ न चाळण्याबद्दल दूषण देऊन स्वतःच्या चालनशक्तीचा डौल मारून जी काय पुंजी बाहेर पडली ती हीच. नाही ह्मणावयाला पुढच्या-हणजे मार्चच्याअंकांत आणखी एक दीड श्लोक आहे. पण तो उलट पुराव्याचा उपहासास्पद झणून दिला आहे. येवढ्या भक्कम सामुग्रीवर 'ओकांचाच पक्ष सर्वथैव' खरा झणून थैमान करणाराची खरोखरच धन्य समजली पाहिजे! वर निर्दिष्ट केलेल्या रघुवंशांतील दोन श्लोकांचा अर्थ वगैरे तर काही दिला नाहीच; पण त्यावर जो कोटिक्रम लढविला आहे, तो असा: "आतां हे जनस्थान मलयाजवळचें उत्तर बाजूचें जें महारण्य तें होय. तेंच जनस्थान नांवाचें अरण्य ६२ व्या श्लोकांत उद्दिष्ट जनस्थान नांवाचे अरण्य झणजे खरालय होय. पांड्य देशाजवळ जनस्थान असल्यामुळे त्या देशींचा राजा आपल्या भावावर खारी करील या भीतीने रावण त्याशी तह करिता झाला. तर हे जनस्थान चार योजनांचे नाशिकीय जनस्थान कालिदासाचे मनांत खात्रीने नसावें हे कोणीही।