या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २०१ वल करील. कारण, नाशिकीय जनस्थान पांड्यदेशापासून किती दूर होतें, व मध्यंतरी इतर राजे होते किंवा नाही याचाही विचार मनांत आल्यावांचून राहूं नये. व्हां हा कालिदासाचा पुरावा श्रीमंतांच्या दोन शब्दांवरील (ह्मणजे जनस्थान व मलय यांवरील) कोटीस किती विघातक आहे याचा श्रीमंतांनी व इतर सुज्ञ वाचकांनी जरूर विचार करावा." होय, जरूर विचार केला. ह्यांत विघातक पुरावा तो कोणता? आझांस तर कळत नाही. त्या वेळेची राज्ये आतांप्रमाणे तुकड्या तुकड्यांची नव्हती. दंडकदेश हा इक्ष्वाकूच्या तिसऱ्या मुलाकडे होता. त्याने गुरुकन्येवर बलाकार केल्यामुळे त्याच्या शापाने पुढे तोच देश 'दंडकारण्य' झाला. ह्यावरून एक एक राज्याचा विस्तार केवढा होता हे लक्ष्यांत येईल. शिवाय, मध्यंतरी असणारे राजे रावणाचे मांडलिक असण्याचा विशेष संभव आहे. तेव्हां वरील शंकेत अर्थ तो कोणता ? ह्यापुढे "वि.विस्तारा'चे मुद्दे व कोटिक्रम बहुतेक सटरफटरच आहेत. तथापि त्यांचाही थोडक्यांत विचार केला पाहिजे. ४"वादीप्रतिवादी यांच्यामध्ये शिक्षणादि परिस्थितीमुळे समाजांत फारच अंतर आहे....यद्यपि दोघेही वादीप्रतिवादी सर्वप्रकारे योग्य जोड आहेत तथापि दोघांचीही दृष्टि भिन्न असल्यामुळे हा वाद इतका वाढला आहे. - आमची जुनी वादाची रीति अशीच आहे." कशी ? खरे असेल तेंच बाहेर काढावयाचें ! केवढा चमत्कार ? पण नवी रीति कशी काय ? लपंडाव करावयाची, हीच की नाही ? पुढे वि.वि. ह्मणतात "नाटककार कथा 'थोडी अस्ता. व्यस्त' करून लिहितात ह्मणून ते अविश्वासनीय कसे ?" आधी त्यांनी जनस्थान हाणजेच भद्राचलं असें कोठेच हटले नाही, आणि हटले असलेलें खरें धरून चालल्यास-"जो अंबरी उफळितां खुर लागला हे । तो चंद्रमा निजत. नूवरि डाग लाहे ॥" असेंही मानतां येईल. व 'पानपतच्या घनघोर' संग्रामावरून पाटिलबावास 'मद्यपी' बनवून त्यांच्या पदरी 'लालन बैरागणी' सारखें लचांड सुद्धा बांधता येईल! ह्यापुढे दोन चार पृष्ठे "विस्तारा'ने पुराणांची टर उडविण्यामध्ये खर्ची घातली आहेत, व शेवटीं इत्यर्थ काढला आहे तो असाः "पुराणांचा पुरावा जेव्हां श्रुतिस्मृति, रामायण व भारत यांच्याविरुद्ध नसेल तेव्हांच तितक्या पुरता मान्य करावयाचा. अन्यत्र त्यांचा कादंबरीवजा उपयोग समजावयाचा." पण द:खाची गोष्ट येवढीच की श्रुतिस्मृतिविरुद्ध कोणत्या पुराणाचा पुरावा दिला आहे तेवढें मात्र "विस्ताराने नमुद केले नाही ! २६ 1:556