या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. महाराष्ट्रांतील लोकभ्रमाप्रमाणे (1) गोदोद्गमाकडील जनस्थान मानल्यास किती अनर्थापात होत आहेत हे ओकांनी दाखविले आहे." होय. 'अनर्थापात' ह्मणजे किती ? आणि सर्वांत श्रेष्ठतम अनर्थापात हा की, दोन सुधारकी पंडितांच्या थोताडांचा पराजय !! ह्यापुढे "विस्तारा" श्रीमंतांवर एक मोठीच तोहमत आणिली आहे ती ही: "प्रथम कौसल्या ही उत्तरकोसलाधीशाची कन्या असे श्रीमंत ह्मणतात, त्यास आधार काय ? वामनरावजींचा, दक्षिणकोसलकन्यका कौसल्या होती असें ह्मणण्यास पुरावा वाल्मीकि रामायण, रघुवंश व ब्रह्मपुराण हे ग्रंथ असावेत." पण पुढची वाक्ये ह्याहून मजेची आहेत: "मात्र हे तिन्ही ग्रंथ वाचतांना प्रतिपदोक्त वचनांचाच पुरावा पाहिजे असल्यास तो मात्र मिळणार नाही. (उत्तम !) बाकी अनुमानाने-पुरावे मिळतील." "विस्तारा"ने अनुमानिक पुरावे तयार केले आहेत. पण आमी त्यांस प्रत्यक्ष पुरावेच दाखवून देतो. रा. रा. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांनी 'भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश' नामक सुंदर, विपुल माहितीने भरलेला ग्रंथ सात वर्षे परिश्रम करून तयार केलेला वाचकांस ऐकून तरी माहित असेलच. ह्यांतील माहिती त्यांनी फार सारासारविचाराने मिळविल्याचे प्रस्तावनेत सांगितले आहे, त्यांत पुढील शब्द येणेप्रमाणे सांपडतात: कौसल्या ईशान्य कोसलदेशीय भानुमान् राजाची कन्या, व दशरथराजाची स्त्री ती. ही रामचंद्राची माता. कोसल-भारतवर्षीय भरतखंडस्थ देश. याचे इंद्रप्रस्थ मध्य धरून पूर्व आणि दक्षिण असे दोन भेद पांडवांच्या वेळेस होते. त्यांत पूर्वकोसलाचे ईशान्य आणि आग्नेय कोसल असलेले दोन भेद त्या त्या अक्षरक्रमांत पहावेत. ईशान्यकोसल-इंद्रप्रस्थाच्या पूर्वेकडे असणाऱ्या दोन कोसलदेशांतील, ईशान्येकडे असणारा कोसलदेश तो. यास उत्तरकोसल अ. काशी किं० कांतिकोसल अशीही नांवे आढळतात. (भा० स० अ० ३०) - वरचा "विस्तारा"चा अमनधबक्याचा पुरावा कोणीकडे, आणि हा प्रत्यक्ष सवा कोणीकडे ? पण कांहीं का होईना? चूक कबूल करण्याची गोष्ट "विस्ताग'च्या स्वाधीन आहे. तो ती कधीं कबूल करणार नाही ! ओकांनी एके ठिकाणी असें झटले होते की 'राम नाशिकाकडे गेला असता, तर त्यास तापी व नर्मदा ह्या नद्या लागल्या असत्या. त्यांचा वाल्मिकीने कोठेच उल्लेख केला नाही.'