या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २०३ त्यावर श्रीमंतांनी आक्षेप असा काढला की, राम कोणीकडूनही गेला तरी, कृष्णानदी त्यास ओलांडलीच पाहिजे होती. तिचा तरी त्याने कोठे उल्लेख केला आहे ? ह्यावर "वि.विस्ताराचे उत्तरः "कृष्णानदी ही उत्तर देशीय ग्रंथकारांस माहित नव्हती असें ह्मणावे लागते. ब्रह्मपुराण अध्याय ७० श्लोक २३ व ३३-३४ यांजमध्ये प्रसिद्ध नद्यांची नांवें दिली आहेत, परंतु त्यांत कृष्णेचें नांव मुळीच नाही. तेव्हां दक्षिणेतली ही नदी वाल्मीकीस माहित नसावी यांत आश्चर्य नाही, व ह्मणूनच तिचा त्यांनी उल्लेख केला नाही. परंतु नर्मदेचा उल्लेख नसावा हे मात्र आश्चर्यकारक आहे." . । 'आपला तो बाब्या. आणि दुसऱ्याचें तें काटें ही ह्मण येथे बरोबर लागू पडते. बरे, हे कसेंही असो. पण नर्मदा व तापी नद्या चुकवूनही रामास पंचवटीस जाण्याचा रस्ता ओकांनी सांगितला आहे, तिकडूनच कां राम गेले नसावत ? पण तो 'रामगिरी' ह्मणे रामाचा नव्हे, आपल्या पुराव्यापुर्ते नाटककार खरे धरावयाचे, व विरुद्ध दिसले की त्यांस खोट्याच्या पंक्तीस बसवावयाचें ! हा खासा धंदा ! कालिदासानें वर्णिलेला 'रामगिरी' हा रामाचा नव्हे, हे अन्य स्थळी ओक सिद्ध करून दाखविणार होते. एक खोटे पुढे आणण्यासाठी दहा खरी लपवावी लागतात ती ही अशी! 'गौतमीमहात्म्यकाराने 'पंचवटी'संबंधाने एकही शब्द काढला नाही,' असें ओकांनी ठासून सांगितले होते. त्यावर श्रीमंतांनी त्याच महात्म्यांत सूर्याची कथा काढून देऊन पंचवटी'बद्दल असलेला स्पष्ट उल्लेखही दाखवून दिला. इतका विधि व सालंकृत कन्यादान झाल्यावर तरी, "वि.विस्तारा"नें स्वस्थ बसावे की नाही ? पण तो कसचे ऐकतो! त्यावर त्याचे ह्मणणे: "राम जनस्थानपुरीत आल्याचा गौतमीमहात्म्यकार उल्लेख करीत नसताही श्रीमंत वाल्मीकी, जनस्थानारण्य नाशिकीय जनस्थानपुरी होय असें पुनः ह्मणतात, याचे आश्चर्य वाटते. हेच जनस्थान होय ह्याला पुरावा 'चतुर्योजनविस्तीर्णम्' व दुसरे प्रमाण गौ० म० अ० १९ यांत 'तया पंचवटाश्रमः' असें अजागलस्तनवत् उच्चारण होय. (त्याने 'कंठरववत्' उच्चारण केले नाही ही मोठीच चूक !) परंतु गौतमीमहात्म्यकाराला पंचवटी किंवा पंचवटाश्रम हा काही विशेषसा संस्मरणीय पदार्थ वाटला नसावा. कारण प्रतिअध्यायाच्या शेवटी संस्मरणीय तीर्थाची नामवारी येत असते. तसा प्रकार पंचवटीसंबंधाने मात्र कोठे नाही." पंचवटीचें नांव सुद्धा ज्यांत नव्हते, त्यांत नांव नव्हे कथा सुद्धा काढून दिली. आता ह्मणे तेथें. राम आले होते असें कोठे हाटलें आहे ? एकंदरीत न देत्याचा