या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. वार शनिवार येवढीच गोष्ट खरी ! 'संस्मरणीय तीर्थांच्या नामवारीत कवीने पंचवटी घातली नाही.' बस्स झाले. वादांत जय आला! आतां काय, फक्त मशाल विझविण्याचा हुकूम सुटला की, आटपले काम ! येथपर्यंत "विस्तारा". च्या उत्तराचा विचार संपला. ५. ह्या कलमांत "वि.विस्तारा"च्या ह्या लेखांतील 'वाग्दानासंबंधाने थोडासा विचार करावयाचा आहे. "विस्तारा"च्या ह्या लेखकाची प्रसिद्ध टीका झटली झणजे 'तरुणीशिक्षण नाटिके' वरील होय. ती द्वेषबुद्धीने व 'सुधारकी' दुराग्रहाने नखशिखांत भरलेली आहे. आपल्या 'सतीर्थ्या'ला 'उन्मादवायु' झाला आहे असे समजून तीत प्रस्तुत लेखकाने 'चरके देण्याचे व 'डागण्याचे' काम फारच धैर्याने केले आहे! ही टीका वाचली हाणजे शिष्टाचाराचा व प्रस्तुत लेखकांचा निखालस छत्तीसांचा आंकडा असावा असें मनांत आल्या. वांचून राहत नाही. . असे असून 'बालबोध'कार ह्मणतात "टीका करतांना पुस्तकांतील गुण विस्तृत करून कसे दाखवावेत व दोष दाखवितांना पुस्तककर्त्यांच्या पोटांत 'गुदगुल्या' कशा उत्पन्न कराव्यात ही करामत प्रस्तुत लेखकाच्या आंगीं उत्तम प्रकारची वसत होती.” 'सतीर्थ्याने स्त्रीशिक्षणापासून तोटे होतील हटले, ह्मणून त्यावर 'उन्मादवायु' झाला आहे असा आरोप क रून त्यास 'चरके' देणे ह्याचंच नांव 'बालबोध' गुदगुल्या !! तेव्हां असे 'सतीर्थ्याला' डागणारे गृहस्थ आमच्यासारख्या तिन्हाइताला सुधे जाऊ देणार थोडेच! आमच्या माथ्यावरही त्यांनी दोन तीन पुष्पं फेंकली आहेत. त्यांचा परिमळ आह्मी एकट्यांनीच अनुभवला, तर अप्पलपोटेपणा होईल, ह्याकरिता वाचकांसही त्यांतील थोडेसे भागीदार करूं. प्रथमतः त्यांनी "श्रीमंतांच्या मागून री ओढणारे कोकिळकार" असें झटले आहे. ते वादाच्या संबंधांत उक्तच आहे. त्याबद्दल काही विशेष नाही. परंतु दुसऱ्या खेपेस त्यांनी आझांस 'भिक्षापति' बनविले आहे तें मात्र निखालस अप्रासंगिक होय. 'लक्षापतीच्या खाली सारे 'भिक्षापती'च आहेत, त्यांच्यामध्ये दुसरा कोणताच वर्ग नाही, भिक्षेवांचून व श्रीमंतीवांचून निर्वाहास अन्य कोणतेच साधन नाही, असे "विस्तारा'सारख्या सर्वाकडून पाठ थोपटून घेणाऱ्या अनुभविक टीकाकाराने समजणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय. पण ते स्वतःच काखेत मोदी अडकवून लोकांचे उंबरठे पुजण्यास पुढे झाले आहेत, त्याअर्थी त्यांना आपल्या वर्गात आह्मांस ओढल्याबद्दल यत्किंचितही वाईट वाटत नाही. पण