या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २०५ तिसरी जी त्यांनी दुगाणी झाडली आहे, ती पाहून मात्र कोणासही हांसूं आल्यावांचून राहणार नाही. तो प्रसंग त्यांनी असा आणला आहे: "पण त्यांतल्या त्यांत आनंदाचा भाग हा आहे की, वामनरावजींच्या पक्षास प्रतिकूल असा एकादाही उल्लेख श्रीमंतांस मिळाला नाही. नाहीतर एखादा उल्लेख असून वामनरावजींच्या कडून चुकून निर्दिष्ट झाला नसता तर 'परपुष्ट कोकिळा'स अकांड तांडव करण्यास सांपडलें असतें." गौतमीमहात्म्यांत 'पंचवटी'संबंधाने 'एक अक्षर सुद्धा नाही असा ओकांनी तोरा मिरविला असतां, श्रीमंतांनीं पंचवटी शब्दच नव्हे, तर सूर्याची सारी कथाच्या कथाच नाकावर टिचली; ओकमान्य नव्या शोधकांचे अग्रणी डा० भांडारकर ह्यांचे 'तिन्ही पुराणांच्या मताप्रमाणे जनस्थान मणजेच नाशिक असे समजले पाहिजे' ह्मणून ठाम मत डोळ्यांपुढे उघडले, बोरुबुवाकडून ओकांचेच घोंगडे ओकांच्या गळ्यांत घातलें, क्षितिषोडशांशे'ची चुकी ओकांच्या पदरांत घालून प्रत्यक्ष "विस्तार" महाराजांकडूनच 'लंकापुरीच्या स्थितीसंबंधानें वामनरावजींचा पक्ष श्रीमंतांनी सुरेख ढासळून टाकिला आहे' असें प्रांजलपणे कबूल करविले. इतके साडे सोहळे झाले असून 'प्रतिकूल असा एखादाही लेख मिळाला नाही' ह्मणून 'जयघोष' करून टाळ्या पिटण्याइतकी, व 'परपुष्ट कोकिळकार' ह्मणून गालिप्रदाने देण्याइतकी शरमेची गोष्ट कोणचीच नाही. वादामध्ये विनोद खुलतो, पण त्यांत मार्मिकपणा पाहिजे. 'परभृत्' शब्द घातला असता, तर कदाचित् त्यांत श्लेष साधून विद्वत्ता तरी दिसली असती ? 'परपुष्ट' ह्या शब्दाने मनाची अनुदारता व हलकेपणा मात्र व्यक्त झाला आहे. वादाचे खंडण करण्याची जर आंगांत धमक नव्हती, कोकिळाचे वाग्प्रहार जर दुःसह झाले होते, तर ह्या पंडितंमन्य लेखकानें "विस्तारा"चा एक सबंध अंकच्या अंक 'केरळकोकिळास पुष्पांजलि' हाणून भरून काढावयाचा होता, हणजे ह्याहून अधिक समाधानास जागा तरी झाली असती! असो, पण "विविधज्ञानविस्तारा'सारख्या 'लोकमान्य' व 'जरठ' मासिकपुस्तककाराकडून ज्याअर्थी ही कोकिळास पुष्टता आली आहे, त्याअर्थी ती आमांसही मोठी लाभदायक होईल, असे समजून मोठ्या भक्तिभावाने आह्मी शिरसा वंद्य करतो. पण त्या बिचायाकडून आमचे खरोखरच जर खंडन झाले असते, तर ही पुष्पेंशीच काय, पण आणखी आलेल्या हारतुऱ्यांचाही परमादराने आह्मीं स्वीकार केला असता. पण तसा जोम वयपरत्वें त्याच्यांत राहिला नाही ह्याबद्दल मात्र वाईट वाटते.