या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. अस्तु. आता फक्त वादाचे मुद्दे व वादीप्रतिवादींची उत्तरे व काही नवे पुरावे पुन्हा एकवार वाचकांच्या नजरेसमोर आणण्याकरितां थोडक्यात सांगून हे प्रकरण पुरे करतो. ६ ह्यांत कै० ओक व कै. पंडित-किंवा वि.विस्तार हे वादी व श्री० कुरुंदवाडकर व पाहिजे तर 'त्यांच्या मागून री ओढणारे केरळकोकिळकार' त्यात सामिल करा-हे प्रतिवादी होत, ही गोष्ट लक्ष्यांत ठेवून वादांच्या मुद्यांचा विचार करावयाचा. (अ) पूर्वपक्ष-जनस्थान किंवा पंचवटी झणजे नाशिक असें हल्ली समजतात, हा भ्रम आहे. भद्राचलंजवळ गोदावरीच्या मुखाशी जें जनस्थान आहे, तेथें राम होते, असें नवीन शोधकांचे आहे. उत्तरपक्ष-हे मत 'शोधकांचे' नसून 'अशोधकांचे मत आहे. (ब) पूर्वपक्ष-वाल्मिकी रामायणाप्रमाणे चित्रकूटापासून पंपेपर्यंत नकाशात दाखविलेला रामाचा मार्ग होय. उत्तरपक्ष-वाल्मिकी रामायणांत जनस्थान हणजे नाशिकच, किंवा भद्रा चलंच असें स्पष्ट नाही. शिवाय, दिशा व अंतरे दिलेली नाहीत, ह्यास्तव नाशिकीय जनस्थानावरून रामाच्या मार्गाचा नकाशा होऊं शकेल, व तोही खोटा ह्मणता येणार नाही. (क) पूर्वपक्ष-लंका हेच सिंहलद्वीप. ह्यास ज्योतिषशास्त्राची प्रमाणे, उत्तरपक्ष-'क्षितिषोडशांशे' ह्याचा अर्थ चुकला आहे. हा मुद्दा "लंकापुरीच्या स्थितिसंबंधानें वामनरावजींचा पक्ष श्रीमंतांनी सुरक्ष ढासळून दिला आहे.” असें ह्मणून "विस्तारा'ने हार घेतली. तेव्हां ह्या मुद्या. च्या संबंधानें वादीकडे शून्य झाले. (ड) पूर्वपक्ष-गौतमीमहात्म्यांत 'पंचवटी'संबंधाने एक शब्दही नाही. हा - उत्तरपक्षाने-श्रीमंतांनीं-सूर्याची सबंध कथा व पंचवटीस्थान काढून दिले. शिवाय १ मुद्गलपुराण. २ गणेशपुराण इत्यादि आधार आहेत. प्रतिवादींचा पुराणांवर विश्वास नाही. (ई) पूर्वपक्षाकडून प्राचीन संस्कृत नाटकांचा पुरावा आहे, पण फारसा जोरदार नाही. भवभूतीचे मुख्य वाक्य पढें येईल, उत्तरपक्षाचा-नाटकावर विश्वास नाही.