या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०७ अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. (क) पूर्वपक्ष-नव्या शोधकांचे इंग्रजी ग्रंथ. हा पूर्वपक्षाचा काय तो अत्यंत विश्वसनीय पुरावा होय, त्यापैकी डाक्टर भांडारकरांचा लेख हाः "जेथें राम रहात होता ती पंचवटी ह्मणजे नासिक; परंतु कवीने आपल्या नायकाला विंध्यापासून नासिकाइतक्या दूरस्थळी पश्चिमेस नेले असेल, असे फारसे संभवत नाही. रामायणांत तसेच उत्तररामचरितांत, जे वर्णन आहे त्यावरून पाहतां राम ज्या पंचवटीमध्ये रहात होता, तिच्याजवळ गोदा पुष्कळ रुंद असली पाहिजे. नासिक गोदेच्या उगमापासून फार जवळ आहे. तेथे ती रुंद असण्याचा संभव नाही." उत्तररामचरितांतील गोदावरीच्या संबंधाचे भवभूतीचे मुख्य वाक्य 'गद्गदनदगोदावरीवारयः' हे, हे मुळी मुखाकडे लागत नाही; उगमाकडेच लागते असें आमचं मत आहे. (पहा. के. को. पु. १२ अंक ८ पान १८८) तेव्हां डाक्टर भांडारकरांचा पुरावा उरला काय तो एक-तो हा-"की कवीने रामाला इतक्या पश्चिमेस नेण्याचा संभव नाही." येवढ्याच 'नव्या शोधकांच्या' 'विशेषमान्य' पुराव्यावर सारी येवढ्या वादाची इमारत ! ह्यांत 'जनस्थान हाणजे पंचवटी.' हे भांडारकरांचे पहिलेच वाक्य ध्यानात ठेवण्यासारखे आहे. उत्तरपक्षाकडून भांडारकरांच्या दुसऱ्या मताच्या त्याच्याच खालच्या ओळी:-- "दुसऱ्या पक्षी पाहतां........मार्कडेय पुराणांत गोवर्धन हे शहर आहे, असे लिहिले आहे; परंतु वायुपुराण व मत्स्यपुराण ह्यांचे ह्मणणे गोवर्धनपर्वत होता असे आहेसे दिसते. याप्रमाणे गोवर्धनाचा जो स्थलनिर्देश केला आहे त्यावरून गोवर्धन या नांवाचे नासिकाजवळ जे खेडे आहे तेच ते असावे. आणि याप्रमाणे पाहतां पंचवटी ह्मणजे नासिक असेंच तिन्ही पुराणांचे ह्मणणे आहे असे समजले पाहिजे." तेव्हां आतां तिन्ही पुराणांचे हणणे सयुक्तिक, का संभवनीय नव्हे' हे भांडारकरांचे स्वतःचे मत सयुक्तिक ? येवढाच कायतो विचार करावयाचा. ओ. कांनी भांडारकरांचे पहिले मत तेवढे दिले, आणि दुसरें कां दिले नाही ? विस्तार ह्मणतो "पहिले मत त्यांचे स्वतःचे ह्मणून दिले." दुसरी पुराणांची हा