या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वे. णून दिली नाहीत! कारण, पुराणें अविश्वसनीय, 'कादंबरीवजा !' प्राचीन स्थलनिर्णयाच्या संबंधांत पुराणे 'कादंबरीवजा' आणि 'नव्या शोधकांची संभवनीय नाही' असली सबळ मतें 'विशेषमान्य' ! अशा प्रकारे हा मुख्य आधारस्तंभ इतका भरभक्कम आहे ! ! बाकीची बोरुबुवांची मते फारशी महत्त्वाची नाहीत. ती पाहिजे असल्यास मुख्य वादाच्या विषयाच्या पुस्तकांत किंवा केरळकोकिळाच्या मागच्या लेखांत पहावीत. येथपर्यंत वादाचे प्रधान मुद्दे झाले. आमचे नवे पुरावे थोडेसे आहीं पूर्वी दिलेच आहेत. आतां आणखी थोडेसे असलेले ह्याखालींच दाखल करून ठेवतो. प्रथमतः ओकांनी रामाच्या मार्गाचा जो नकाशा दिला आहे, त्यांत चित्रकूटाहून रामाचा मार्ग त्यांनी आग्नयेदिशेकडे वळविला आहे ही पहिली चूक, तो मार्ग थेट दक्षिण दिशेच्या रोखाने फिरविला की नाशिकाकडेच येईल. चित्रकूटाहून राम दक्षिण दिशेकडे निघाले असें 'रघुवंशांत' स्पष्ट आहे ते असें:(ग) रामस्त्वासन्नदेशत्वाद्भरतागमनं पुनः। आशंक्योत्सुकलारंगां चित्रकूटस्थली जहौ. ॥ २४ ॥ प्रययावातिथेयेषु वसन्त्राषिकुलेषु सः । दक्षिणां दिशमृक्षेषु वार्षिकेष्विव भास्करः ॥ २५ ॥ सर्ग १२ (ह) आतां कांही कोशांतून निघणारे शब्दांचे अर्थ देतो: जनस्थान-गोदावरीच्या दक्षिण तीरी असणारे स्थानविशेष, यासच प्रस्तुत नासिक हाणतात. येथे रामाच्या वेळेस शूर्पणखा, व खरराक्षस रहात असे. 11 दंडकारण्य-विध्याद्रि व शैवल पर्वत ह्यांमधील प्रदेश, मा प्रस्रवण-जनस्थानाच्या दक्षिणेकडील पर्वत. -भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश(ज) तस्मिन्काले महारण्ये राक्षसी कामरूपिणी । विचचार महासत्त्वा जनस्थाननिवासिनी ॥ १ ॥ ह्यांतील 'जनस्थान' शब्दावरील टीप-"हल्ली ज्याला नासिक हाणतात त्या स्थली." -जानोरकरांनी छापलेले 'सार्थ अध्यात्मरामायण.' अरण्य कांड, स. ४