या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २०९ (ल) जनस्थान-of a part of Dandaka forest. दंडकः-of a celebrated district in the Deccan situated between the rivers Narmada and Godawari. (it was a vast region said to be tenantless in the time of Rama.) पुरवणींत जनस्थान-a part of the great Dandaka forest which stood in the vicinity of the mountain called Prasravana. The celebrated Panchavati (identified by local tradition with the place of the same name situated about 2 miles from the present Nassik) stands in this tract. -आपटेकृत संस्कृत इंग्लिश कोश.ह्यावरून जनस्थान कोणतें त्याचा निर्णय सहज होण्यासारखा आहे. (म) परंतु ह्यापेक्षाही एक सबळ पुरावा नासिक ह्या नांवातच स्वयंभू आहे व तो कोणाच्यानेच खोटा पाडवणार नाही. तो असाः-05) शूर्पणखेचें लक्ष्मणांनी 'नासिक' च्छेदन केलें, तें जनस्थानांत केले. ह्याला प्रत्यक्ष रामायणाचीच साक्ष आहे. आणि त्यावरूनच जनस्थानचें नांव 'नासिक' पडले. ह्यापुढे कितीही पुरावे आणले तरी रद्दच होतील असें आमचे मत आहे. ह्या उपरही कोणास वीरकंकण बांधून काथ्याकूट करावयाची असेल तर खुशाल करावी. इतकें सांगून तूर्त आमच्या कलमास म्यान चढवितों. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी भारद्वाजांच्या भ्रमाचा भोपळा.. श्लोक. जिव्हायाश्च्छेदनं नास्ति न तालुपतनाद्भयम् । निर्विशेषेण वक्तव्यं वाचालः को न पंडितः ॥ १ ॥ "भरतभूमीतील मार्गावर आपल्याला दोन पर्वत आडवे