या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २११ ही सारखींच किंवा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाटून दिली आहेत. त्यांत यत्किचितही फेरफार करण्याचे त्या सर्व सत्ताधीश प्रभूवांचून इतरांस सामर्थ्य नाही. विधात्याने प्रत्येक प्राणिमात्राच्या भालपटलावर सुखदुःखाची केलेली नोंद सदासर्वकाळ वज्रलेप होऊन बसलेली असते. एखादा मनुष्य खाऊन जेवून सुखी असतो. तो कितीही हाडांची काडें करो, त्याचा निर्वाह जेमतेम होतो न होतो. एक पै शिलकेत टाकीन झटले तर होत नाही. न होऊन मध्येच शेपन्नास रुपये अकस्मात् मिळण्याचे संधान आलेच, तर त्याला मोठा हर्ष होतो. पण ते रुपये उद्या पदरी पडणार तों आजच त्याचा खर्च आगांतुकपणे पुढे येऊन दत्त करून उभा राहतो. मिळून सरासरींत गुढघ्याइतके पाणी असावयाचें तेंच असते. ते कधीं मांज्यांपर्यत चढावयाचें नाहीं, की घोट्याइतकें उतरावयाचें नाही. ह्या गोष्टी जगांतील हजारों लोकांच्या अनुभवाच्या आहेत. हजारों लोक संसार करीत असलेले आपण जन्मापासून पाहतों; ते कधी पालखीपदस्थही होत नाहीत, व कधीं उपाशीं मेलेलेही दृष्टीस पडत नाहीत. त्यांची यातायात पहावी, तर एका पैशासाठी सुद्धा ते अगदी जीव तोडीत असतात. मग असें कां होतें? किंवा पशुपक्ष्यांचे उदाहरण ह्याहूनही उत्कृष्ट आहे. पशु किंवा पक्षी हे पुढच्या काळाकरितां एका दाण्याचाही संग्रह करीत नाहीत. प्रत्यही ताजें मिळवावयाचे आणि ताजें खावयाचें, तरी ते ताजेतवाने आणि आनंदी असतात. जी गोष्ट प्राणिमात्रांची तीच गोष्ट राष्ट्रांची. | तथापि कित्येक लोकांची अशी समजूत आहे की, काही राष्ट्र दिवसेंदिवस सुधरत आहेत. त्यांच्यांतील अज्ञान नाहीसे होत आहे; त्यांच्यांतील दुःखें विलयास जात आहेत. तेव्हां तीं उत्तरोत्तर सुखांतच लोळत रहावयाची. दुःख झणून कसलें तें त्यांना पहावयास सुद्धा मिळावयाचे नाही. सांप्रत पाश्चात्य राष्ट्राकडे पाहून आमच्यापैकी कित्येकांचा जीव अगदी थोडथोडा होतो. त्यांचें वैभव पाहून ते आश्चर्याने अगदी चकित होऊन जातात. त्यांच्या सुखाबद्दल ह्यांच्या तोंडांस अगदी पाणी सुटते. त्यांच्या अनुकरणासाठी हे लाळ घोटून जिभळ्या चाढू लागतात. त्यांना वाटतें पाश्चात्य राष्ट्र ह्मणजे एक प्रतिवर्ग आहे. तथे विद्या काय, ज्ञान काय, कलाकौशल्य काय, रीतिरिवाज काय, खाणेपिणे काय, संपत्ति काय, विलास काय, स्त्रियांना स्वातंत्र्य किती, धर्म किती थोर, वेडेवेडे चार नाहीत, अनाचार नाहीत, कांहीं एक नाहीं ! “अमरत्व हेच सिंहासन; ऐरावतासारखें वाहन; अमरावती ही राजधानी; जेथें ऋद्धिसिद्धीची भांडारें; अमृताचे भरलेले तलाव; ज्या गांवांत कामधेनूंचीं खिल्लारें; देव हे जेथें सेवक मिळतात; जिकडे तिकडे चिंतामणीची जमीनः कल्पतरूंची उपवनें; गंधर्व जेथें गायन करितात; रंभेसारख्या जेथें नृत्य करित अस"सात; तेथें स्त्रिया तर काय असंख्यात आणि त्यांत उर्वशी प्रमुख; मदन जेथें पलंगा