या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. वर येऊन निजतो; चंद्र सडा घालित असतो; वायुसारखे हुजरे पुढे धावत असतात; बृहस्पती ज्यांत प्रमुख आहे असे कल्याणदायक आशीर्वाद देणारे ब्राह्मण, स्तुतिपाठ गाणारे देव तर काय शेकडो. ज्या ठिकाणचे स्वार केवर राजाच्या पंक्तीस बसणारे; उच्चैःश्रव्यासारखें अश्वरत्न ज्याच्या बिनीला!" हे जसे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वर्गाचे वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे हुबेहुब पाश्चात्य देशांतला थाट. कापड विणायला अग्नि; सूत काढावयाला वरुण; दिवाबत्ति करावयाला वीज; चित्रे काढावयाला सूर्य; पाणी ओढावयाला वायु; बसावयाला रथः निजायला खुच्या; जेवायला खाणावळी: फिरायला उपवनें: विलासाला लक्ष्मी छत्र धरायला सरस्वती; बोलायला फोनोग्राफ; ऐकायला टेलिग्राफ; पहावयाला दुर्बिणी; राहायला तीसतीस मजली वाडे, करमणुकीला कलाकौशल्य; विद्यावि. शिष्ट स्त्रिया; ज्ञान विशिष्ट पुरुष; स्वातंत्र्याचे पीक; सदाचाराची फळे; सुखाचें माहेर: द्वीपांतरास जायला आगबोटी; आणि स्वर्गात जायाला विमानें! न्याय करायला एका आईबापांची लेकरें, आणि पहायला आकाशांतला बाप !! रावणाची लका जशा सारी सुवर्णमय होती, त्याप्रमाणे पाश्चात्य देश ह्मणजे आजकाल सुखानेंच ओतून काढलेला आहे. पण ही त्यांची भ्रांती आहे. घुशीच्या एका बिळांत दगडधाड ठोकून हातांतील खोरें कुदळ पुरती खाली सुद्धा ठेवली नाहीत तोच, ती जसा उस कडे भोंकसा पाडून ठेवते, त्यांतलाच हा सारा खेळ आहे. ज्यानी आपले सारे आयुष्य लोकोपकारार्थ वाहिले आहे. ज्यांनी आपल्या अप्रातम वक्तृत्व शक्तीने साऱ्या जगाला चकित करून सोडले आहे; इंग्लंद, अमेरिका, चान, जपान, सिलोन, तिबेत, इत्यादि देश ज्यांच्या बुद्धिमत्तेला माना डोलवित आहेत व सौजन्याला नम्र होत आहेत: मोठे मोठे पाश्चात्य वर्तमानपत्रकत 'साक्षात् अवतारी पुरुष' 'नखशिखांत ईश्वरी तेज भरलेला पुतळा ह्मणून प्रमान सद्गदित होत आहेत; ज्यांनी अर्ध्या जगांत प्रवास करून, पाश्चात्य देशांत वर्षेच्या वर्षे काढून तेथील अनुभव घेतला आहे; ते श्रीमद्विवेकानद स्वामी एके ठिकाणी ह्मणतात: " केव्हां केव्हां हिकडची जमीन विधवांच्या अभंनी भिजते; तिकडे पाश्चात्य देशांतले वातावरण अविवाहित स्त्रियांच्या दुःसह श्वासोच्छासाने विषमय होऊन जाते. हिकडे दारिद्र्याने जन्माची माती होते; तिकडे ऐषआरामाच्या अतिशयाचा कंटाळा येऊन जन्माचा विध्वंस होतो. इकडे खावयाला मिळत नाही ह्मणून लोक आत्महत्या करतात; तिकडे वाजवीपेक्षां फाजिल खावयास मिळतें ह्मणून लोक आ. त्महत्या करतात; दु:ख हे हाडी खिळलेल्या संधिवाताप्रमाणे आहे. त्याला पायर्यातून हांकून लावले तर ते डोक्यांत शिरतें: डोक्यांतून हांकललें तर कोठे तरी तिसऱ्याच