या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. ठिकाणी ठाणे देतें! त्याला हुसकून लावावयाचें-किंवा थारेपालट करावयाला लावावयाचा-एवढीच कायती इतिकर्तव्यता."E ntries ह्यावरून वरच्या कल्पना किती भ्रांतिमूलक आहेत याची सहज साक्ष पटत. ह्या लोकांची आशा सुद्धां दुणावत चाललेली आहे. त्यांना वाटतें स्त्रियांना स्वातंत्र्य येऊ लागलें; गृहिणी विद्यासंपन्न होऊ लागल्या; पुनर्विवाहाची सुरवात झाली; सोवळ्याओवळ्याने तोंड चुकविलें; सोडावाटरचा पाय पुढे पडला; हॉटेलांची पूजा होऊ ला• गली; जगद्गुरूंना धाब्यावर बसविले; त्यामुळे धर्मराजाच्या यज्ञमंडपांत लोळणाऱ्या मुंगसाप्रमाणे आह्मी अर्धे अधिक तर सुवर्णाचे बनलोंच. आतां काय? इंग्रज सरकारच्या कृपाछत्राखाली आणखी चार दोन घुलाटण्या खाल्या की सारे सुवर्णमय! आमचा सारा देह-नाक, तोंड, डोळे, कान, हात, पाय सारे पिवळे पिवळे धमक्क आणि रातोत्पलासारखें लालीलाल! आमच्या बायका, मुले, घर, दार, सारे सुवर्णाचेंच होणार. अहाहा! काय ते आमचे भाग्य ? मग आमची बरोबरी करणारा कोण आहे ? 'ईश्वरेच्छेने पाश्चात्य राजछत्राखाली आह्मी आल्यापासून लढाया, बंडावे इत्यादि ताप विलयास जाऊन शांततेच्या शीतल छायेंत आह्मी आराम पावलो आहों; आमांस विद्यामृताचा रतीब लावून दिल्यामुळे आमची कांती वाढत चालली आहे; खेड्यापाव्यांतील मुलांबाळांस सुद्धा काशीपासून रामेश्वरापर्यंतची बित्तंबातमी दररोज कळते आहे; पाहिजे तिकडे जाण्याला राजरस्ते आमच्यासाठी खुले आहेत; एका क्षणाधीत जादूप्रमाणे ह्या टोकाची बातमी त्या टोकाला जाऊन पोंचते आहे; हजारों म्युनिसिप्यालिट्या, हजारों हॉस्पिटले, लाखों डाक्टर डोळ्यांत तेल घालून आमच्या प्राणावर पहारा करीत आहेत; एक पै खर्च केल्याशिवाय अमृतासमान दिव्य औषधी गरीबगुरीवांस सुद्धा पाहिजे त्या वेळी मिळत आहेत; मोठासा पाहून तोफेच्या तोंडी देण्याचे मन्वंतर जाऊन प्रशस्तपणे खल केलेल्या न्यायाचे चूर्ण आमच्या हातावर पडत आहे; खातंत्र्याच्या दागिन्यांनी जे. पी. पासून तों तहत के. सी. ई. पर्यंत सारे लोक फुलून गेले आहेत; धर्मखातंत्र्यावर बहिष्कार टाकल्यामुळे तें रानोमाळ बोकळत सुटले "Here the earth is soaked sometimes with widow's tears ; there in the west, the air is poisoned with the breath of sobs of the unmarried. Here poverty is the great bane of life; there the life-weariness of luxury is the great bane that is upon the race. Here men want to commit suicide because they have nothing to cat; there they commit suicide because they have so much to eat. Evil is every where, like old rheumatism. Drive it from the foot it goes to the head; drive it from there it goes somewhere else. It is a question of chasing it from place to place; that is all."