या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आहे. हे सर्व बाह्योपचार व अर्पण केलेली सुखाची साधनें नाकबूल करण्याइतका कृतघ्न कोणी सांपडणार नाही. पण त्याबरोबरच आमचे स्वातंत्र्यरूप हातपाय मोडले; निस्तेजतेचा आंगांत ज्वर भरला; पराक्रमाच्या नाड्या मरत चालल्या, समाजहृदयाचे ठोके अस्ताव्यस्त पडत चालले; हे तर काय? पण मुख्य जीवनशक्ति तिलाच भिरड लागून सारी प्राणज्योतच विलयास जाण्याच्या बेतांत आली आहे. हे कोणाच्याच ध्यानांत नाही. ही जीवनशक्ति कोणती? तर जिच्या योगाने मनुष्यांत मनुध्यपणा येतो, समाजांत जोम चढतो; कुटुंबांत स्वास्थ्य येते; प्राणिमात्रांस सुख मि. ळते; कर्तव्यास सहाय्य होते; प्रेमरज्जूची गांठ दृढ होते, अमोघशक्ति प्रगट होते; आणि अखेरीस ईश्वराच्या सन्निध पोंचविते. अशी जी आदिशक्तिरूप "भक्ति" ता आह्मास पाठमोरी झाली आहे; ती आमच्या घरांतून निघन चालली आहे. त्यामुळे आमच्या समाजाची हाडे खिळखिळी झाली; कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही अशी दुर्दशा उडाली: प्रत्येक गोष्टींत तीन तेरा आणि पांच बारा होऊन गेले. (पुढे चालू.) संस्कृतचंद्रिकासमालोचना. न पारयामो वयमेतादृशीं चद्रिकां वर्णयितुं । यस्याः ललितपदविन्यासोद्भूतमाधुर्यमधुलोलुपैः कियद्भिरपि महाशयैः स्तवनकरणाक्षमत्त्वं सूचितमेवास्त्यसकृत्पूर्व । केयं सरला च सुभगा च भाषासरणिः क चेदं सौलभ्यं गौरवं चाथस्य क्वचैतद्गीर्वाणभाषापाटवमिती सर्वेऽपि गुणा अहमहमिकया वर्णनक्रमे प्रथमपदप्राप्तये पुरत एवधावन्ति । चंद्रिकायाः प्रकाशः पाठकानां मनसामज्ञानतमोदूरीकृत्य प्रकाशयति तेषु ज्ञानदीपं । आनंदयत्यात्मानमुल्लासयति हृदयम् प्रसादयति चेतश्च । तस्या अविच्छिन्नागमोऽस्माकं महते संतोषाय । ब्रह्मकृतिनिर्मिता चंद्रिकाऽचेतनत्त्वादस्याः शीतत्त्वेन बाह्यप्रकाशनेनैव च पुनर्जीवयति केवलं क्लान्तं शरीरं । इयं तु सचेतनेव मुहुर्मुहुर्मृदुलभाषणेनेव सुभगा कामिनीव कमपि प्रसादं वितनोति । रंजयति च चेतः । श्रीमदप्पयादीक्षितचरणानां जन्मकुंडल्योपेतं किंचिद्वत्तम् श्रीशिवराजविजय इत्यादि महात्मनां चरितानां बालावबोधसुगमया सरस्वत्या निवेदनं तथा च मूर्तिपूजाप्रामाण्य स्थापनं, समुद्भावितचंद्रिकादोषनिराकरणं विज्ञानकुसुमम्, आत्मावलबनादि निबंधाश्चेत्यादि भिनानाविधैर्मनोहारिभिर्विषयैश्च परिप्लुताम्राजते चेयं चंद्रिका