या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसाच सिंहलल्यातही कसब. त्या व तितकेंच वैचित २१८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. झणजे सिंहलद्वीपांतील-लंकेंतील लोकांची वाचकांस थोडीबहुत माहिती सांगावयाची आहे. आपल्या चालीरीतींहून मलबारी लोकांच्या चालीरीती जितक्या भिन्न, तितक्याच सिंहली लोकांच्याही भिन्न. मलबारी लोकांत जें व जितकें वैचित्र्य, सिंहली लोकांतही तें व तितकेंच वैचित्र्य. त्यांच्यांत जसे कसब, तसेच ह्यांच्यांतही कसब. त्यांच्यांत जसा वागणुकींचा भोळवटपणा तसाच सिंहली लोकांतही भोळवटपणा. मलबारी लोकांचा जसा शकुनभोळेपणा, तसाच सिंहली लोकांचा. त्यांचा जसा पेहराव, तसाच जवळजवळ ह्यांचाही पेहराव. मिळून चालीरीतींत दोन्हीही जवळ जवळ समसमान आहेत. तेव्हां अशा सिंहली लोकांची माहिती, मलबारवर्णनाप्रमाणेच वाचकांस मनोरंजक होईल, ह्यांत तिळमात्र संदेह नाही. जनरीती-सिंहली लोक कसबी आहेत. त्यांच्या आंगीं फक्त लोहारकामाची कायती उणीव आहे. पण बाकी सर्व कसबे त्याच्या आंगांत भरलेली असतात. त्यांना ज्या ज्या वस्तची गरज लागते, ती ती वस्तु ते स्वतः तयार करतात; आणि स्वतःच तिचा उपभाग घेतात. राहावयास घरे बांधावयाची ती सुद्धा आपली आपणच बाधतात. त्यांचे भाषण फारच मृदु आणि संभावितपणाचे असते. तरी पण एखाद्या प्रतिज्ञेच्या भाषणाबद्दल त्यांच्यावर विश्वास ठेवतां येत नाही. ते सहसा खोटे बोलत नाहीत; आणि प्रसंगविशेषीं जर का त्यांस खोटे भाषण करतांना धरले, तरीही पण त्यांत त्यांना आपली बेअब्रू झाली असे वाटत नाही. कारण, तो त्यांचा सांप्रदायच असतो. ते हाडकाठीने भक्कम, स्वाभिमानी व गर्विष्ठ असतात. ते अगदी मोजकी झोंप घेतात. त्या लोकांना सहसा राग येत नाहीं, व आला तरी फार वेळ टिकत नाही. मारणे किंवा धोपाटा घालणे त्यांच्या गांवींही नसते. ह्या लोकांत गुलाम बाळगण्याची चाल असते. त्या गुलामाला केव्हा कधीकाळी एखादा ठोसा लगावला, तर एखादें उदादरण, नाही तर तेही विरळाच. ते पाळीव गुलाम आपल्या धन्याशा खुशाल सलगीने बोलत असतात. ते मोठे काटकसरीने वागणारे अमन लोभीपणांत त्यांचा पहिला नंबर. थोडक्याशा फायद्याकरिता, त आपली उपासमार करून घेतात.