या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २१९ त्यांच्यांतील सर्वांत दांडगे दुर्व्यसन मटले ह्मणजे चोरी त्याचा त्यांस मनस्वी तिटकारा असतो. त्यांस मांसाहाराचा व सुरापानाचा अभ्यास असतो; त्यांत त्यांची परिमितता असते. पण शरीरस्वच्छतेसंबंधाने ह्मणाल तर मात्र अगदीच विपरीत. गलिच्छपणा हे त्यांचे आदिदैवत. आळस हा दुस्मान तर त्यांच्या नेहमी बोकांडी बसलेला. 'आज करूं, उद्यां करूं' ह्यांतच त्यांचा ब्रह्मानंद. अगदी निकडीचे काम असले, व आतां मात्र स्वस्थ बसून भागणार नाही असें दिसले, मणजे मग स्वाऱ्या काम करावयाला उठावयाच्या. नाही तर 'रामाय तस्मैः नमः'. शकुनभोळेपणाचे वेड तर त्यांस अतोनात. शिंक आली पुरे की, शुभाशुभाचा होरा झालाच सुरू. एखादे काम चालले असतांना शिक येते असे वाटल्यास, त्यांचा हात आखडलाच. आमच्या इकडच्यासारखें पल्लिकापतनाचे बंड सुद्धा त्यांच्या पांचवीस पुजलेले. काम करीत असतां, मध्येच जर पाल कुचकुचली तर त्यांचे काम कांहीं कालपर्यंत तटून राहावयाचे, आणि मग शंका प्रतिशंका चालावयाच्या, की, ह्या पल्लिका शब्दाचा अर्थ काय बरे असावा ? आणि आपणावर काहीतरी वाईट ग्रह ओढवणार आहेत, हे शेवटचे निदान ठाम ठरलेले असावयाचे. हेचसे काय, पण आमच्या जुन्या शकुनभोळ्या माणसांप्रमाणे, सकाळी उठल्याबरोबर कोणाचे तोंड पहावयास मिळतें, तें शुभ कां अशुभ हे सुद्धा ते लोक पहात असतात. सिंहली लोकांच्या बायका संसारांत फार दक्ष असतात. उधळेपणानें खर्च करणे ह्या गोष्टीची त्यांस लाज वाटते. आणि चांगला हात राखून ठेवणे, ह्यांतच त्यांची सर्व आढ्यता व भूषण असते. त्या नेहमी आपली शेखी मिरवित असतात की, लांकडांचे कुणके व तासलेले ओंडके, हेच आपल्या पतींच्या कल्याणाचे डबोलें. तेथील बायका खुशाल, आपल्या नवऱ्यांच्या देखत पाहिजे त्या मनुष्याशी, पाहिजे तेव्हां, बोकळत असतात. पण पुरुषांच्या मनांत त्यांच्या वर्तनाविषयीं काडीमात्र शंका येत नाही. ते लोक कट्टे जात्यभिमानी असतात, त्यांतही मुख्यतः विवाहाचे स. बंधानें भिन्न भिन्न पेहरावावरून व्यक्त होतात. किंवा वस्त्रप्रावर्णाशिवाय