या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२१ अंक १० वा. आक्टोबर १८९९. मुभा नाही. किंवा ते घरावर कौले घालतील, किंवा भिंतीस चुना फांसून घरांस सफेती देतील तर तेही चालावयाचे नाही. बड्या लोकांनी मात्र तेवढी सोईवार टुमदार घरे बांधावी. संसार-त्यांचा संसार किंवा संसाराचा संच ह्मणजे घराच्या मध्यभागी शिंक्यावर टांगलेली चार दोन गाडगी; रांधपाची एक दोन पितळेची भांडी; एखादी दुसरी घडवंची. धान्य सांठवावयाला काही कणगी व टोपल्या; निजाबसावयाला थोडक्याशा तया, भात कांडावयाला मुसळे, व लांकडी उखळ. एक खिसणी, धान्य दळावयाला एक जातें ह्मणजे झाले. एवढ्यावर संसार थाटला ह्मणून समजावें. खाणेपिणे-त्या लोकांना फक्त तांदूळ आणि मीठ एवढें घरांत असले झणजे बस्स. मग त्यांना कशाचीही गरज नाही. कारण थोडींशी हिरवीं गार पाने, लिंबाचा रस, आणि त्यांत थोडींशी मिन्ये, एवढे तोंडी लावणे झाले की, त्यांचे पंचपक्वान्नांचे मिष्ट भोजन होते. त्या लोकांत गोमांसाहार वW. ते तो अगदी विषवत् मानतात. इतर मांस किंवा मत्स्याहार देखील कचित्. आणि ते कदाचित् एखाद्यापाशी असतील, तर ते खाण्याऐवजी, हजार वांट्यांनी विकून, त्याचे पैसे घरी आणतात. ते भात खावयाचा तो, पितळींत घेऊन अथवा पानावर घेऊन खातात. बंपाकाच्या भांड्यांत 'कढी' शिजवून तयार करतात, व पुरुषांस जेवावयास बोलावून बायका वाढू लागतात. जेवणास जावयाच्या अगोदर, व पुन्हां जेवून उठल्यानंतर ते आपले हात पाय तोंड धुऊन स्वच्छ करतात. हा त्यांचा नेहमींचाच क्रम असतो. ते आपले पाण्याचे भांडे दुसन्यास हातळू देत नाहीत. हातावर पाणी घ्यावयाच्या वेळेस, ते एका हातानें, दुसन्या हातावर ओततात. स्वैपाक करावयास बसावयाच्या वेळेस, भांड्यांत तांदूळ वैरी तोपर्यंत, स्वैपाकीणबाई, इतर मंडळीस गुपचुप बसावयास सांगतात. कारण मध्येच जर कोणी बोलले तर भातास उकळी फुटून, तांदूळ फुगणार नाहीत, अशी त्या लोकांची कल्पना असते. काय समजूत पहा! १. घडवंची मात्र असावयाची ती पाठरहित. ह्मणजे जिला खुर्चीसारखें मागे टेंकावयाला असते, तीवर बसावयाचा मान फक्त राजाचा, इतर कोणाचाही नाही.