या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ केरळ कोकिळ, पुस्तक १३ वें. आगतस्वागत-ते लोक एकमेकांस भेटले झणजे, आमच्या चालीप्रमाणेच दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. ' श्रेष्ठ प्रतीचा मनुष्य साधारण मनुष्याला एका हातानेच रामराम करतो. आणि फारच कमी प्रतीचा दर्जाचा-मनुष्य असेल तर नुसती मानच तुकवून अदब बजावितो. बायकांची चाल झणजे दोन्ही हात कपाळापर्यंत नेऊन जोडावयाचे. प्रथम भेटीलाच नेहमींचे स्वागत झणजे असें असतें. "कां आपले कसे चालले आहे ?" "ठीक" ही आमच्या देशांतील परस्परांची प्रश्नोतरे ठरीवच आहेत. विवाहविधि-साधारणपणे लग्नाची सिद्धता आईबापेंच करतात; सौंदर्यापेक्षाही जातीचे महत्व जास्ती. वानिश्चय ठरला ह्मणजे वरपक्षाकडून वधूला विवाहवस्त्रे पाठविण्यांत येतात. त्यांत एक १२।१४ हात लांबीचे वस्त्र आणि एक जांबळ्या रंगाची चोळी असते. लग्नतिथिदिवशी नवरदेव, आपल्या इष्टमित्रांसहवर्तमान वधूगृही येतो. आणि येतांना त्याने मेवामिठाई व इतर जिन्नस आणिलेले असतात. नतर वधूवर एकाच ताटांत जेवतात व परस्पर समसमान असल्याचे व्यक्त करतात. कधी कधी त्यांचे करांगष्ठ परस्पर बांधून टाकतात. दुसरे दिवशी नवरदेव मित्रमंडळीसहवर्तमान, वधू पुढे, व आप तिच्या मागून, अशा समारंभाने आपल्या गृहांत प्रवेश करतो. वरान वधूच्या मागून चालावे, अशी तिकडे चाल आहे. त्या लोकांत एकदा अशी गोष्ट घडलेली सांगतात की. नवरदेव पुढे चालले असता, मा वधूला कोणी पळवून नेली. तसे होऊ नये ह्मणून ही चाल पडला असावी. असो, नंतर वरगृही सर्व मंडळी गेल्यावर एक समाराधना हात त्यांच्या विवाहसंबंधांत ह्मणण्यासारखा राम नसतो. वधूवरांचा संबध प्रेमरज्जूने बांधलेला नसतो. स्त्रीपरुर्षे परस्परांस चैनीस येईल तेव्हा ल लोक वृद्धावस्था प्राप्त होईपर्यंत चार पांचदां लग्ने करतात. स्त्रीपुरुषांनी काडी मोडतांना जर त्यांना मुलेबाळे झाला असली, तर पुरुषाकडे मुलगे, व बायकोकडे मुली जातात. पुरुषाला फक्त एकच बायको असते. पण स्त्रीला मात्र नेहमी दोन तीन नवरे असतात; आणि तेही बहतकरून भाऊभाऊच असतात. मलेबाळे-मूल जन्मले की, लगेच फलज्योतिष्यास बोलावून आणतात