या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २२३ आणि तें मूल शुभशकुनावर जन्मले आहे, की मूळावरच आले आहे, ह्याची भवति न भवति करतात. अपशकुनावर निपजले असे निदान ठरले, तर मग काही विचारावयासच नको. त्या अर्भकाच्या पापाचे घडे पुरे भरलेच, ह्मणून समजावें. मग त्याला पाडतात, आणि मारतात, अथवा बुडवितात, किंवा जिवंतच्या जिवंत पुरून मुक्ति देतात. हाय ! हाय! किती खुळेपणाचा प्रकार हा! केवढी करता ही ! "केव्हां केव्हां आईबा, तें अर्भक आपणांलाच अनिष्ट होईल, आपत्याच मूळावर आहे, ह्मणून ज्योतिष्याच्या स्वाधीन करतात. आपल्या पाटच्या गोळ्यांवर इतकी क्रूरता कां करतां ह्मणून जर त्यांस कोणी विचारिले, तर त्याचे उत्तर ते येणेप्रमाणे सांगतात. "मी आपल्या घरात राक्षस (घरादारावरून नांगर फिरविणारा) का उत्पन्न होऊ द्यावा ?" पहिल्याच मुलग्याला मात्र ही पाळी ९० वांट्यांनी येत नाही. परतु खडोगणती मुलें व्हावयाला लागली झणजे मात्र त्यांचे कपाळ हेच. मग ते वाईट ग्रहावर निपजलें, या भाकितावर कपाळमोक्षास पात्र व्हावयाचे हे ठरलेलें. हें बालहत्येचें अघोर पातक झाले, असे ते मानीत नाहीतच, आणि त्यांना त्याची क्षितीही पण नसते. लहानपणी मुलें ओळखायाला नावे ठेवतात. पण तीच थोर झाली, मणजे त्यांचीच नावें दसऱ्या धाकट्या मुलांना ठेवतात. पोटाचे धंदे-सिंहली लोकांचा मुख्य धंदा झणजे शेतकी. उच्च प्रतीचे लोकांस सुद्धा स्वतःच्या शेतांत खपून शेतकी करावयास हरकत नाही, तथापि त्यांत त्यांना जरा कमीपणा वाटतो. हमालीचे काम असें वाटून ने करावयाची त्यांस शरम वाटते. तें काम झणजे केवळ गुलामाचा ते खेरीज करून, बाकी पाहिजे ते काम ते करतील. काही लोक खतःकरितां सुती कपडे विणून तयार करतात. सिंहलद्वीपांत घिसाडी, सोनार, सुतार, आणि रगारीही आहेत. तेथें बाजार मुळीच भरत नाही. शहरांतून थोडींशी दुकाने असतात त्यांतून फक्त तांदूळ, सुती कापडे, मीठ, तंबाकू, सुया, चाकू, कातन्या वगैरे शिकलगारीचे जिन्नस विकावयास असतात. तेथें तीन प्रकारची नाणी व्यवहारांत चालतात. एक पोर्तुगीज सर