या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. कारने पाडलेले. दुसरें चांदीच्या तारेनें वेष्टिलेले, माशाच्या गळासारखें मुरड घातलेले असते. हे नाणे ते लोक राजाच्या परवानगीने स्वतःकरितां तयार करतात. तिसरे छोटेंसें रुप्याचे नाणे सुमारे एक आण्याच्या किंमतीचे असते. हे सिंहलद्वीपचा राजा पाडतो. वरच्यासारखींच लहान लहान नाणी अद्याप त्रावणकोर संस्थानांत दृष्टीस पडतात. ह्मणजे मलबारांतील दाम, चक्रे वगैरे. धर्मबंधने-सिंहलद्वीपांत राजाच्या हुकुमाशिवाय दुसरे कायदे नाहीत. पण प्राचीनकाळापासून ज्या रूढी पडल्या आहेत, त्याच ते लोक कायद्याप्रमाणे लेखितात. ज्या वेळी देशांत धान्यसमृद्धि होते, त्या वेळी मणाच्या ठिकाणी १६ दीडमण धान्याचा दर होतो. एखाद्याने आपले कर्ज जर फेडलें नाहीं, तर दोन वर्षांनी ते दुप्पट होते, पण त्यापुढे मात्र ते वाढत नाही. एखाद्या कर्जेदार कुळाला जर कर्ज फेडण्याची शक्ति नसेल तर, धनको, माजिरेटची परवानगी घेऊन, रिणकोची मालमत्ता, मुळंबाळे व स्वतः तो, इतके अडकवून ठेवतो. प्रसंगविशेषीं आपणा स्वतःस किंवा आपल्या मुलांबाळांस विकून टाकले, तर ते न्याय्य होते. एखाद्याने जर चोरी केली, तर त्याने त्याच्या सातपट धन परत केले पाहिजे, आणि तेही देण्याची जर शक्ति नसेल तर त्याला गुलाम करून टाकतात. - केव्हां केव्हां तंटे तोडणें तें, तप्ततैलांत बोटें ठेवून, दिव्य करून काय तो निर्णय ठरवितात. एखाद्याने जर दंड दिला नाही, तर त्याच्या पाठीवर-मानेवर-धोड ठेवून त्याची भरपाई होईपर्यंत ती तशीच राखतात. अपराधी बायकांस डोईवर मातीने भरलेली पाटी देऊन, उभे रहावयास लावतात. शिष्टसंप्रदाय वगैरे-सिंहली लोकांत स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या दरजाप्रमाणे पदव्या असतात. आणि त्या बारा-किंवा त्याहूनही अधिक-अ. सतात. पुरुषांनाही अनेक पदव्या असतात, परंतु स्त्रियांइतक्या नाहीत. राजासमोर आपल्याविषयी काही बोलावयासचे असल्यास, ते 'मा असे केलें' असें प्रथमपुरुष वाक्यांत न योजतां निराळ्याच तन्हन बोलतात. तें असें, " कुत्र्याच्या हातून हे घडले" ह्मणजे राजापुढे