या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २२६ आपला क्षुद्रपणा, कापदार्थता व विनय ही व्यक्त करावयाची ह्मणजे राजापुढे आपली किंमत कुत्र्याइतकी आहे, आणि ते जसें पायाशी असते, तसें प्रभुचरणाशी आपण नमून आहों, किंवा प्रभूच्या घरचे श्वान असें दर्शवावयाचे. तेच मुलांविषयीं ह्मणतांना "कुतऱ्याची पिलें" किंवा "कुतरीची पिलें" असें ह्मणावयाचे. ते दुसऱ्याच्या घरी गेले तर, विचारण्याची तहाः-“कां कशाकरितां आपलें येणें झालें?" ह्याजवर उत्तर "नाहीं आपलें उगीच." असे यावयाचे. मग एखादें महत्वाचे काम घेऊन कां येईना? तन्हा हीच.. एखाद्याने एखादी वस्तु नजर द्यावयाला आणली, तर ती वस्तु घेण्याविषयीं जरी ते उत्सुक असले, तरी देखील "छे! छे! एवढे नको मजकरितां, शाबास तुमची तरी." परंतु इतके ह्मणतांना, ती वस्तु घेण्याकरितां, आपला हात पुढें करितोच. तेव्हां आहे की नाही मजा त्यांचे नेहमींचें शपथ घेणे ह्मणजे आईची, मुलाची किंवा डोळ्यांची घेतात. परंतु त्यांची प्रतिज्ञेची भाषणे झणण्यासारखी प्रौढतेची नसतात, व तशी विचार करण्यासारखीही नसतात. pora बाप अचकट विचकट गालिप्रदानें, आपल्या मुलांस व आई मुलींस देत असतात. त्यांच्या बागांतील एकादी वस्त जर चोरीस गेला, तर मोठ्याने ओरडून ह्मणतात." नीच कुलांत उत्पन्न झालेल्या कोण्यातरी ठगाचे हे काम." हीच भाषा चांगली तास अर्धतास चालू असते. मग कोणाचें तें कृत्य हे ठाऊक नसेना कां ? ते ख्रिश्चन लोकांस अगदी नीच शब्द वापरतात. तो असा " गोमांसाहारी गुलाम". लेखनवाचन-कागदांच्या ठिकाणी सिंहली लोक वृक्षपत्रे वापरतात. त्यावर अणकुचीदार पोलादी कलमाने अक्षरें कोरावयाची. महत्वाचे ग्रंथ व लेख ताडपत्रावर लिहून त्यांच्या गुंडाळ्या करून ठेवलेल्या असतात. नेहमींचे पत्रव्यवहार ताडपत्रांवरच चालतात. फलज्योतिष-सिंहली लोकांत ज्योतिषांचा फलफलाट फार. कोणाची पेरणी सुरू झाली, कोणी कुळव धरला, कोणी प्रवासास निघाला, कोणी एखादें नवीन काम हातांत घेतले, की ह्या ज्योतिषीबोवांचे पीक पिकलेंच. ह्या ठरीव वेळेला, त्यांची खात्री बसून गेलेली असते की, पहिला पेरा आपल्या हातून होणार. मग ते हवे तर पुढे महिन्याने