या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• २२६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. सर्व पेरणी करीनात का, अघाडीवर हात यांचा. त्याच वेळेला ह्यासाठी ते प्रवासाला निघावयाचा आव घालीत असतात. ह्मणजे त्यांना खरोखरी प्रवासाला जावयाचे असतें तें, पुढे काही दिवसांनी तरी देखील घांट घालावयाचा तोच.) दुखणेबाणे व अंतकाळ-ते लोक तरूण धरतात, तेव्हां बहुधा आपली आपणच परीक्षा करतात. औषधे मटलीं ह्मणजे कोठे कसले तरी पाले, कसल्या तरी साली, कसल्या तरी मुळ्या जमा करून द्यावयाच्या. ही औषधे त्यांस चांगली अवगत असतात. दुखणे बरे होण्याला, भुताखेतांचे बळिदान वगैरेंवर त्यांचा विश्वास असतो. त्यांचा उत्तम प्रकार मटला ह्मणजे मृताला अग्नि द्यावयाचा. गरीब गुरीब मेला तर त्याला जंगलांत एक डबरा खणून, मृतदेहाभोवती चटई गुंडाळून, दोघे तिघेजण त्या जागेवर त्यास आणतात व पुरतात. मग त्याला इतर थाटमाट व समारंभ कोठचा असणार ? बायका मरणोन्मुखाबद्दल शोक करतात, तो मासलाः-केश विखरून टाकावयाचे, कपाळावर दोन्ही हात लावावयाचे, आणि मृताचे नसते गुण वणून व पुढे आपल्या वैधव्यदशेत राहण्याबद्दल, ओक्साबोक्शी विपळाप करीत बसावयाचे. परंतु नवरा मृत झाला की पुरे त्यांनी दुसरा कोणी तरी वर शोधून काढलाच. कसा आहे नवऱ्याच्या कळकळीचा मासला! बालोद्याने. श्लोक ( शालिनी ). बालोद्यानी बैसतां मन्मनाला । वाटे आहे नंदनी ह्या क्षणाला ॥ शोभा याची नंदनालाहि ये न । लजेने ते स्वर्गि राहे लपून ॥ १॥ १. ह्या कविता रा. स. धो. तांबे-देवगड यांजकडून आल्या आहेत. त्यांत हखदीर्घाच्या संबधाने अतिशय कर्णकटु असलेली ४।५ अशुद्धे दुरुस्त करून त्यांस स्थळ दिले. ह्याचे कारण, साधारणपणे ही कविता सरळ, व त्यांतील कितीएक शब्द सरस असे आढळून आले. त्यावरून सदर कवी थोड्याच दिवसांत चांगले होण्याचा संभव आहे. अशा होतकरू कवीस उत्तेजन मिळावे हा एक प्रधान हेतु आहे. --ए. के. को.