या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. अहो पितृनेत्रोदकें तृप्त झाला; मनें मुक्त सायुज्य ब्रह्मी मिळाला ॥ ११३ -कित्तानिशी आंत वेशीत गोपगृहीं तो, प्रवेशीत अंतही आग्रही तो ॥ ६ __आनंदतनय-गोरसक्रीडा. लोपोनि आठरुप दावित एकलाची, ने स्वगृहासि गति धन्य तया लिलांची ।। का आनंदतनय-नवरसचरित्र. तृ किंवा दृ हे जर शुद्ध स्वरच असते, त्यांच्या योगाने मागील अक्षरावर कांहीच आघात न होता, त्यांस दीर्घत्व न येते, तर वरच्यासारख्या कवींना अशी योजना करण्याचे काहीच कारण नव्हतें हे उघड आहे. (६) आतां ह्याच्या उलट उदाहरणे-झणजे कवितेंत त किंवा दृ आणून त्याच्या मागील अक्षरास द्वित्त्व येत नाही असे मानले, तर ती कविता झणावयाला कशी जड जाते तें सहज समजेल. प्राचीन संप्रदायास विरुद्ध न जाणारा, व शुद्धाशुद्धाविषयी अत्यंत लक्ष्य पुरविणारा महाराष्ट्र कविवर्य झटला हणजे मोरोपंत होय. परंतु ह्या कवीचे श्लोकबद्धकाव्य फारच थोडें आहे. आणि तु, दृच्यासंबंधाने उलगडा होण्याला श्लोकाशिवाय नीटसा मार्ग नाही. ह्यामुळे मोरोपंताच्या कवितेत तृ किंवा दृच्या योगार्ने मागील अक्षरास द्वित्त्व आलेलें उदाहरण बहुधा कोठे आढळत नाही. पण तृ किवा दृने मागील अक्षरास द्वित्त्व न आणल्याची उदाहरणे बरीच आढळतात. त्यांची, तो तो छंद ह्मणतांना कर्श दशा होते पहा:गुरुपितृपतिसुत-हे ते, भूषण ह्मणती कुलस्त्रियांस, त-ही तें. ॥ ३७ कृष्णविजय. आझी दैवहतांनी, निजपितृगृहवास बहु सुखत्वहतांनीं ॥ १० वामन पंडितांनी व मुक्तेश्वरांनी तृ आणि दृ ह्या अक्षरांनी त्याच्या मागील अक्षरास दीर्घत्व येतें असें मानून केलेल्या कवितांची उदाहरणे वर दिलींच आ. हेत. परंतु ह्याच कवींनी जुनाट संप्रदाय अंगिकारून ह्मणजे तृ व ह ह्यांनी मागील अक्षरास द्वित्त्व येत नाही असे मानून-हणजे वरच्या उलट-ही कविता केलेल्या आहेत. पण त्या ह्मणतांना कशी त्रेधा उडते ती पहावीः त्यजुनि सुहृद माया, चालिला रामभेटी ॥ -मुक्तेश्वर