या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २२७ उद्यानी ह्या बाल हे कल्पवृक्ष । माळी आहे सद्गुरू त्यांत दक्ष ॥ संत्रस्तांना सौख्य वाटे जयानें । शोभा त्याची काय वर्ण मुखानें ॥२॥ बालांच्या ह्या आवली शोभताती । कुंड्यांमाजी वृक्ष हे वाटताती ॥ प्रातःकाळी येथ माळीही येतो । शिक्षा वारीं नित्य बाळासि देतो ॥३॥ शिक्षा द्या ही नित्य चित्तक्षुधेला । गोडी नाहीं स्वर्गिच्याही सुधेला ॥ थोडी थोडी प्राशितां पुष्टि येई । मृत्यूचीही भीति तैं दूर नेई ॥ ४ ॥ माळी जैसा काढितो कीड मुंगी । ज्ञानार्कानें सद्गुरू काढि गुंगी ॥ बाळां लावी नित्य तो सत्यपंथा । अभ्यासाची देतसे रोज संथा ॥६॥ वायूवेगें वृक्ष जो वक्र होतो । माळी त्याला ऊर्ध्वगामी करी तो ॥ तैसा येथे सद्गुरू बाळकाला । सबोधाने लावितो सत्पथाला ॥ ६ ॥ उद्यानाच्या पाहुनी रम्यतेला । वाग्देवीने येथ संचार केला ॥ क्रीडा चाले नित्य येथें तियेची । पाहूनी ती शांति होते मनाची ॥ ७ ॥ बाळांच्या ह्या बोबड्या बोलण्यानें । लाजावें की सत्य गुंजारवानें ॥ घेती विद्या बालकें गात गात । ऐके कोणी कोकिळाचीच मात ॥ ८॥ माळी जेव्हां बोलतो गोड उक्ती । आनंदाने डोलते बालपंक्ती ॥ हर्षे जाणों वायु बागेत आला । तेणें हाले सर्वही वृक्षमाला ॥९॥ जेव्हां वागे स्वैर तो बाळमेळा । नीती सांगे सद्गुरू त्याच वेळा ॥ दुर्मार्गाला सोडिती सर्व बाळ । सन्मार्गाने चालती सर्वकाळ ॥ १० ॥ माळ्याचे ह्या भाग्य मोठे विशाळ । उद्यानी ह्या राहतो सर्व काळ ॥ वाग्देवीचा जेथ आहे निवास । माळ्यालाही त्यामुळे हर्ष खास ॥११॥ मातें वाटे नित्य येथे बसावें । बाळांसंगें ज्ञानही मेळवावें ॥ माळी देतो ज्ञान हा सर्वकाळ । वाग्देवीने घातली ह्यास माळ ॥ १२ ॥