या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी र भारद्वाजांच्या भ्रमाचा भोपळा. NT (पुढे चालू.) पूर्वीच्या भक्तीचा लेश तरी आमच्यांत आतां राहिला आहे काय? धन्याला पोटाखाली घेऊन आपल्या पाठीवर वार घेणारे चाफाजी टिळेकरासारखे स्वामिभक्त सेवक आतां बियांस तरी सांपडतील काय? धन्याच्या वेषाने पालखान बसून खदेह खर्ची घालणारे भानसारखे मित्र आतां कोणी आढळतील काय ? विषारी करट चोखून गुरूस वांचवावयास तयार होणारे, किंवा खलबत्ता पाठाव ह्मणतांच शिरकमल उतरून पाठविणारे एकनिष्ठ शिष्य हल्लींच्या काळी दृष्टास पडतील काय ? प्रत्यक्ष अहिल्याबाईसारखी जगन्माता काकुळती करित असता, खसंतोषाने अग्नीस देह अर्पण करणारी तिची मुलगी; अप्पारावास प्रत्यक्ष लेकरूं गळी पडले असतां त्यास झिटकारून देणारी, श्री. भाऊसाहा पेशव्यासारख्याचा शब्द परतवून पतीबरोबर सहगमन करणारी बळवत मेहेंदळ्यांची पत्नी; किंवा अतुल वैभवास व भर तारुण्यास मीठ न घाला नारायणास दह अपेण करणारी साध्वी माधवराव पेशव्याची अधोगी रमाबाई; याच्या सारख्या निस्सीम पतिव्रता आतां हडकं गेल्यास सांपडताल काय ? त्या वळची ती निःसीम भक्ति कोणीकडे. व हा हल्लीचा भाडोत्री बाजार काणाकड : हल्लाची भक्ति ह्मणजे शद ताज्या घोड्यावरच्या गोमाशा' किवा ताकापुरत रामायण' हाय. त्यामुळेच आमच्यांतील सत्त्व जाऊन आह्मी केवळ सोपट बनला आहात, मुलगा शिकन तयार झाला. तर बाप ह्मणतो पार अवगला! चिरंजीव पदवीधर झाले तर त्यांना जुना बाप मुळीं शोभेनासाच होतो; भावाभावांच्या प्रेमाचा ऊत दृष्टीस पडावयाचा तो कोटौत! स्त्रियाच्या पातिव्रत्याचें तेज चमकावयाचें तें वर्तमानपत्रांतील नोटिशीत! लबाडीची पूजा ही चाकराची खामिभक्ति; आणि तं नाही तर तुझा काका दुसरा' हे धन्याच प्रेम. हा असा छत्तिसांचा आंकडा कां? तर सर्वांच्या अंतःकरणांतून जाणार 'भक्तिसूत्र' तुटले ह्मणून. जिकडे तिकडे बहुतेक हाच प्रकार दृष्टीस पडतो. १ हल्लींचा गुरुभक्तीचा मासला तर काय विचारूच नये. अथपासून इतिपर्यंत प्रत्येक शाळेला व प्रत्येक तासाला प्रसन्न होणाऱ्या गुरुप्रसादाच्या भाराने बिचारीचे तुकडे तुकडे उडून जातात यांत नवल ते काय?