या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २२९ धुगधुगी उरली आहे तोच उपायांची योजना केली पाहिजे. नाही तर भलत्याच थराला गोष्ट जाईल. हल्ली ज्ञानाचें माहात्म्य फार वाढले आहे. आणि भक्तीला तीन दमडीच्या उधारीने कोणी विचारित नाही ही स्थिति अत्यंत अनिष्ट आहे. ज्ञान हे श्रेष्ठ आहे ही गोष्ट खरी. पण उद्योगावांचून जसें प्रारब्ध लंगडे, त्याप्रमाणे भक्तीशिवाय ज्ञानही पंगू होय. ह्मणूनच नरहरी सोनारासारखे महा साधु ह्मणतात:भक्तीप्रेमेवीण ज्ञान नको देवा। अभिमान नीच नवा तयामाजी ॥१॥ प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमावीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेने जेवि शृंगारू केला । प्रेमेवीण तैसा ज्ञानीया झाला ॥३॥ ही गोष्ट लोक विसरतात. परकीयांच्या सहवासाने ह्मणा, किंवा त्यांच्या गुरूपदेशाच्या बीजारोपणाने ह्मणा, प्रत्येक गोष्टीची व्युप्तत्ति-'थिअरी'-पहाण्याची आह्मांला संवय लागली आहे. समाधानकारक थिअरी ऐकल्यावांचून कोणत्याच गोष्टीवर आमचा विश्वास बसत नाही, व ती गोष्ट करणे आमांस आवडत नाही. 'थिअरी' समजणे हा एक ज्ञानमार्ग आहे ही गोष्ट खरी, पण प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यालाही एक मर्यादा आहे. थिअरी लावीत बसणे ह्मणजे त्या विषयाची चर्चा करणे होय. कोणत्या गोष्टीची चर्चा करावी, व कोणत्या गोष्टीची करूं नये हे ध्यानात घेतले पाहिजे. थिअरी किंवा चर्चा करित बसता कामा नये असेही विषय जगामध्ये पुष्कळ आहेत. दारांत तुळशीचे झाड लावावें ही अंधपरंपरेची चाल आह्मांस पसंत पडत नाही. पण एखाद्या डाक्टराने 'तुळशीच्या आंगीं दूषित वायु आकषून घेण्याची व मनुष्यजीवितास अत्यावश्यक वायु जो 'आक्सिजन' तो सोडण्याची शक्ति आहे' अशी थिअरी बसवून दिली, की लगेच झाली आमच्या वृंदावनाची तयारी ! वंशपरंपरेची चाल ह्मणून आमी कधी मुगटा लावणार नाही, पण 'रेशमाच्या आंगीं विद्युत् असून ती शरीरास आरोग्यता देणारी आहे, असे जर डाक्टराचें मत पडेल' तर मग लगेच आमच्या पितांबराचें आह्मी बासन सोडूं! इतकी ही थिअरीची व्यापकता मनुष्यास कधीच कल्याणदायक व्हावयाची नाही. आधीं असें पहा, की केवढाही विद्वान् झाला तरी कोठपर्यंत थिअरी सांगेल ? ईश्वरी सत्ता आली, की त्याचे घोडें खुंटलेंच, रक्त कशाने शुद्ध होते ? श्वासोच्छासाने. श्वासोच्छासांत काय असते ? हवेतील आक्सिजन. रुधिराभिसरण कशाने होतें ? हृदयाच्या ठोक्याने. हृदयाचे ठोके कशाने पडतात ? ज्ञानतंतूनें. ज्ञानतंतूंना प्रेरणा करणार कोण ? इच्छाशक्ति. इच्छाशक्ति कोठून निघते ? मनापासून. मन हे काय आहे ? व ते कोणी केलें ? हा प्रश्न आला