या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. शहाणे ह्मणतां ते कसे ? ही येवढी गोष्ट त्यांना कशी समजली नाही ? " अशी प्रश्नपरंपरा लागत चालली, तर त्या बिचाऱ्या गुरूने काय करावें? अशा शोधक व चौकस बुद्धीच्या शिष्यास उठून साष्टांग नमस्कार घालावा, आणि आपलें चंबुगवाळे आटपावें, दुसरा मार्गच नाही. मग त्या शिष्याला विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसाद किती होईल, हे काही सांगणे नकोच. तात्पर्य काय, की ज्ञान पाहिजे असेल, तर प्राचीन कालापासून चालत आलेल्या मूलतत्त्वावर विश्वास पाहिजे; भक्ति पाहिजे. आणि आपणाहून श्रेष्ठ असतील, त्यांचा उपदेश आपले कर्तव्य समजून ग्रहण केला पाहिजे. ह्या दोहोंशिवाय ज्ञानप्राप्तीची आशा करणे केवळ व्यर्थ होय. असो. इतके विचार सुचण्याचे कारण पुणे येथे प्रसिद्ध होणाऱ्या 'सुधारक' नावाच्या पत्रांतील 'भारद्वाज' ह्या सहीने आलेले लांबलचक लेख होत. हे लेखक 'सुधारक'कर्त्यांचे सन्माननीय मित्र असून त्यांनी आपल्या लेखांस ता० ५ डिसेंबर सन १८९८ इसवीच्या अंकापासून सुरवात करून सुमारे दहा, अकरा आर्टिकले लिहिली आहेत. 'ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी व ज्ञानदेव इत्यादिकांसंबंधाने आक्षेप' हा त्यांतील विषय आहे. त्यांच्या मनांत ज्या अश्रुतपूर्व कल्पना आल्या त्यांचा लेख त्यांनी 'पाश्चात्य ग्रंथांवरून ज्यांना कळू लागले आहे त्यांस' सादर केला आहे. त्यांतील सारांश: (१) ज्ञानेश्वर व नामदेव समकालीन नव्हते. (२) ज्ञानेश्वर १२०० मध्ये व नामदेव १३०० मध्ये झाले. (३) नामदेवाचा उपलब्ध असलेला जन्मशक चुकीचा आहे. (४) ज्ञानेश्वर व ज्ञानदेव ह्या भिन्न व्यक्ति. (५) ज्ञानेश्वरीचे कर्ते विठ्ठलभक्त (वैष्णव), 'ग्यानबा' टाळकुटे वारकरी नव्हेत. (६) आळंदीस जन्मलेले, नामदेवाबरोबर तीर्थयात्रेस गेलेले, रेड्याच्या मुखाने वेद बोलविलेले, भित चालविलेले ग्यानबा; (७) ज्ञानेश्वरीचे कर्ते ज्ञानेश्वर हे आपेगांवासच जन्मले व आपेगांवासच समाधिस्त झाले. हे निवृत्तिनाथाचे पुत्र असून शिष्य होते, भाऊ नव्हत. हे शाक्त पंथाचे देव्युपासक-अर्थात्-मम्माच्या बाराखडीतले! (८) नामदेव दोन झाले; निवृत्तिनाथ दोन झाले; ज्ञानदेव तीन झाले; व मुक्ताबाई ही केवळ कल्पनेची पुतळी, झणजे पूज्य ! (९) ज्ञानेश्वरी नेवाशास लिहिली ह्याला आधार काही नाही. ग्यानबां'नी एक लहानशी गीतेवर टीका केली आहे,