या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ती तेथे लिहिली असावी. (१०) एकनाथाने ज्ञानेश्वरीतल्या कांही ओव्या मुद्दाम गाळून टाकल्या; व तीत नव्या स्वकृत दडपून दिल्या. कांहीं शब्द गाळून तेथे पदरचे घुसडले, आणि मूळ ज्ञानेश्वरीला अगदीं छिन्न भिन्न करून सोडले. (११) डा० कुंट्यांनी ज्ञानेश्वरीतील शब्दांचा अर्थ कळेना ह्मणून त्यांच्या चिंध्या करून सोडल्या. (१२) नामदेवाचे व ज्ञानेश्वराचे चरित्र लिहिणारांच्या आंगी शोधकता नाहीं, ऐतिहासिक ज्ञान नाही हाणजे ते खुळे आहेत. इ० इ० इ०. श्री ज्ञानेश्वराची कथा आमच्या सर्व महाराष्ट्रमंडळाला महशूर आहे. त्याला केलेले चमत्कार आज शेकडो वर्षे आमच्या आबालवृद्धांच्या तोंडी आहेत, हरिदास, गोंधळी, प्राकृत पुराणिक भक्तिभावाने त्यांची चरित्रे वर्णन करित आहेत. तुकाराम, मोरोपंतादि कवींनी त्यांची चरित्रे आपल्या कवितेत गोवून ठेविली आहेत. संतमंडळींनी ज्ञानेश्वराच्या माहात्म्याची थोरवी गाइला आह; आळदास त्यांची समाधी असन तीस राजेरजवाड्यांच्या सनदा आहत; नेवाशास ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा खांब 'ज्ञानोबाचा खान अचाप प्रसिद्ध आहे. इतकी धडधडीत स्मारकें असतां 'भारद्वाजाचा' सूर भलतीकडेच वाहिला तरी कसा? व हा येवढा नसता उपद्याप तरा कां केला? अशी सहजीं कोणास शंका येईल पण ह्याचा विचार थोडक्यांत आहे. ज्ञानेश्वर महाराज हे निस्सीम भक्तीच्या मार्गाने ज्ञानाच्या उच्च शिखरास पोंचलेले होते. त्यांचा अधिकार अत्यंत मोठा होता. ते राजयोगामध्ये पार गत असल्यामुळे त्यांच्या मध्ये ईश्वरी तेज भरून राहिले होते. त्यांची गुरुनिष्ठा किती अलोट होती, याचा मासला पुढे येणार असल्यामुळे सांप्रत त्याचा उल्लेख नको. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शद्ध अद्वैत मताचा असून त्यामध्ये इश्वरा प्रसाद तुडुंबलेला आहे. तेव्हां तो इतरांप्रमाणे 'सुधारकपंथी' यांसही मान्य झाला आहे. परंतु थिअरी समजल्यावांचून पाऊलही टाकावयाचें नाहीं हा ज्यांचा बाणा, त्या सुधारकांना त्यांच्या मागे असलेल्या 'रेड्याच्या मुखी वद बोलविणे, 'एका अभंगाबरोबर भिंत चालविणे' ह्या भोळसट गोष्टी कशा मान्य होणार? त्या त्यांच्या डोळ्यांत रात्रंदिवस सलतात. त्यांच्या योगाने व अद्वैत ग्रंथास मोठी काळिमा आली आहे असा त्यांचा समज आहे. सुधारक ह्मणजे शब्दपांडित्याचे राजे, किंवा बोलघेवड्याचे मंडप होत. उसन्या कल्पनांवर त्यांची अन्नछत्रे! कृति करावयाची त्यांच्या स्वप्नांत त्यांना माहिती नाही. तेव्हां ज्ञानेश्वरासारख्यांनी देहदंडन करून, राजयोगांत पारंगत होऊन,