या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. कडकडीत वैराग्य व निस्सीम भक्ति आचरण करून संपादन केलेला जो ईश्वरी प्रभाव त्याची कल्पना त्यांस होणार कशी? व मनुष्यास पुन्हा तरुण होता येते; पाहिजे तितका काल वांचतां येते; जलावरून चालतां येतें, ऋद्धि सिद्धि प्राप्त होतात, ह्या अद्भुत गोष्टींवर त्यांचा विश्वास बसावा कसा? शब्दांच्या पलीकडे काही नाही हाच त्यांचा सिद्धांत !! शिवाय अशा ज्ञानसंपन्न कत्याला विठोबाचा वारकरी करण्यांतही त्यांना कमीपणा वाटतो. याकरितां दोन तीन ज्ञानदेवांचे पेव उकरून त्यांपैकी एकाच्या मागे रेडा व भिंत लावून त्याला 'ग्यानबा' बनविलें कीं, एक खटखट उरकली. हा एक उद्देश. दुसरा तेवढ्यानेही जिवाचें नीटसें समाधान होत नाही. कारण, ज्ञानेश्वरी जरी शुद्ध अद्वत मताची आहे तरी तिच्यांत राम, कृष्ण, शंकर इत्यादि सर्वच देवतांस पूज्य मानून सर्वांचीच महती वर्णन केलेली आहे. आणखी, युरोपियन मिशनरी लोकांचा व आमच्या गोपालकृष्णांचा तर बारावा बृहस्पति ! कृष्णाचें किवा कृष्णाच्या लीलेचें नांव काढले, की त्यांच्या कपाळाला पित्त चढलेच. तच बिवलकरी वळण घेतलेले आमच्या सुधारक चमूनें. तेव्हां आतां ती कृष्णांची लीला ज्ञानेश्वरीतून हसकून लावावयाला काय युक्ति काढावी ? हा दुसरा प्रश्न उरला. त्याकरिता एकनाथावर 'गफलती' चा च्यार्ज ठेवून दिला की घडी तुस्त बसली. इत्यादि कल्पना मनांत आणून आपल्या समानशील बंधूकडून पाठ थोपड़न घ्यावी, शोधकतेचा झेंडा मिरवावा, व ऐतिहासिक प्रेमाची शर्करा पसरून घ्यावी, येवढ्याच हेतूने हा येवढा मसता उपद्व्याप केलेला आहे. दुसरे कारण कोणतेंच संभवत नाही. आतां ही येवढी अपूर्व विचित्र इमारत रचण्याला पाया तरी कसला आहे ? आधारस्तंभ तरी कितीसे भक्कम आहेत, व ते कोठून पैदा केले ? अशी सहजींच जिज्ञासा उत्पन्न होते. पण सांगण्यासारखा चमत्कार हा की, ही येवढी अकरा मजली विचित्र इमारत 'भारद्वाजांनी निवळ दोन कुजक्या मेढींवर उभारलेली आहे. आणि त्या मेढी समुद्र किनाऱ्याच्या भुसभुशीत रेवेतउभ्या केल्या आहेत ! तेव्हां त्यांची शामत व धारिष्ट तारिफ करण्यासारखी नव्हेत काय ? ह्यांपैकी पहिली मेड किंवा 'भारद्वाजांच्या मताप्रमाणे आधारस्तंभ हाः (१) ज्ञानेश्वरीची 'प्राचीन' हस्तलिखित प्रत-श्रीज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, व पुढें तीनशे वर्षांनी ह्मणजे शके १५१२ त किंवा त्या सुमारास एकनाथ महाराजांनी ती शुद्ध करून तिचा सर्वत्र प्रसार केला; व त्या शुद्ध केलेल्या पोथीच्याच प्रती हल्ली जिकड तिकडे प्रसिद्ध आहेत. एकनाथांनी शुद्ध करावयाच्या पूर्वीची ज्ञानेश्वरीची