या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वे. प्रत हल्ली कोठेही उपलब्ध नाही. ह्यास्तव एकनाथांच्या हातांत ज्ञानेश्वरी पडण्याच्या पूर्वीची तिची अस्सल प्रत कसलीशी असावी, ती पहावयाची कित्येक विद्वान् व शोधक जिज्ञासूंना उत्कंठा होती हे साहजिकच आहे. सुदैवाने आमच्या 'भारद्वाजा' ना ही एक ज्ञानेश्वरीची जुनी हस्तलिखित प्रत उपलब्ध झाली. तेव्हां तिची प्रसिद्धि करून अनायासें बुभुक्षित विद्वानांस तृप्त करण्याची आलेली दुर्लभ संधि त्यांनी वाया जाऊ दिली नाही, हा मोठा उपकार तर खराच. पण ह्या प्रतीचा इतिहास ते आपल्या स्वतःच्याच तोंडाने सांगतात, तो किती मजेचा आहे पहा! ह्या प्रतीवर लेखकानें आपलें नांव घालून ती शके १६७५ त, मणजे एकनाथांनी प्रत शुद्ध केल्यानंतर (१७५) पावणे दोनशे वषीनी लाहला असा उल्लेख केला आहे. हल्ली उपलब्ध असलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रतीत व ह्या सांपडलेल्या हस्तलिखित प्रतीत बराच फेर आहे असें "भारद्वाज' ह्मणतात. ह्मणजे काही शव्द व ओव्या कमजास्त आहेत. त्यावरून 'भारद्वाज' आपल्या वुद्धिमत्तेने असा तर्क बांधतात की, ही प्रत एकनाथांनी शुद्ध केलेल्या प्रताच्या पूर्वीच्या प्रतीवरून झणजे अस्सल ज्ञानेश्वरीवरून व ह्या शुद्ध केलेल्या नव्या प्रतीवरून लिहिलेली असावी; व हाणनच त्यांनी ह्या प्रतीला 'प्राचीन' प्रत असें नांव दिले आहे! ह्यावरून किती चमत्कारिक अनुमान निघतात एकनाथाच्या वेळेपर्यंत ज्ञानेश्वरी मळी फारशी प्रचारांतच नव्हती. एक थाच्या वेळेसच तिच्या प्रती अत्यंत दर्मिळ होत्या. ज्ञानेश्वरी एकनाथाच्या कानावर सुद्धा आली नव्हती. इतक्यात एका तेल्याने आपल्या घरात पडल एक जुनीपुराणी ज्ञानेश्वरीची प्रत आणून दिली. त्या अस्सल ज्ञानेश्वरीच तर मुळाच उपलब्ध नाही. तेव्हां प्रस्तुत हस्तलिखित प्रतीच्या लेखकासच पावणे दोनशे वर्षांनंतर ती अस्सल प्रत कोठून मिळाली ? पाव दोनशे वर्षे झणजे कांहीं पोरखेळ नव्हे! बरें; घटकाभर कबूल केले की, खा लेखकाला अस्सल प्रत मिळाली होती. तर तिच्याबद्दल त्याने ह्या प्रतीत र वर उल्लेख केला नाही ? ती जर अस्सल प्रत होती. तर तिच्या बरहुकुमच त्याने सारी प्रत कां तयार केली नाही? वरें; नवी प्रत घेतली होती ह्मणाव, तर तिच्या बरहुकूमही ही प्रत नाही. ह्या प्रतीचा मेळ दोन्हीही प्रतींशी नाही. ह्मणजे दोन्हीशीही हिचा कमजास्तपणा आहेच. येवढ्यावरूनच ती दोन प्रतींवरून लिहिली असावी असा तर्क करावयाला आधार कोणता? प्रत्यक्ष एकनाथ महाराजानाच अस्सल प्रतीत 'मनःपूत फिरवाफिरव केली असें भारद्वाज' ह्मणतात, तर प्रस्तुत प्रतीच्या लेखकाने तरी त्यांत दडपादडपी केली नाही कशावरून? तो कानांत तुळशीच घालून बसला होता, असें मानावयाला साक्ष कोणाची : "भारद्वाजा'च्या 'तर्कशास्त्राप्रमाणे ही प्रत दोहींवरून तयार केलेली असें क्षणभर