या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. कबूल केले तरी, तेवढ्यावरून पावणे दोनशे वर्षांनी पश्चात् झालेल्या ह्या भेसळ व गंगाजनी प्रतीला 'प्राचीनत्त्व' ते कसे काय येतें ? हे कोडे आमच्या अल्पमतीला तर काही उलगडत नाही. भारद्वाजां'च्या सर्व कल्पनातरंगांचा दांडगा उगम ही 'प्राचीन (1) प्रतच, असल्यामुळे तिचा हा मनोरम इतिहास आमच्या वाचकांनी तूर्त ध्यानात ठेवावा झणजे बस्स. आतां हिलाच टेंका देणान्या दुसऱ्या मेढीकडे वळू. (२) भारद्वाजांचा अनुभविक शोध-ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली ह्याबद्दल उल्लेख शेवटच्या अध्यायाच्या उपसंहारांत जनरीतीप्रमाणे केलेला आहे. त्यांतील 'दक्षिण लिंगी' ह्या शब्दाचा अर्थ दक्षिण तीरी असा पाहतांच त्याच्या 'चिंधड्या उडविल्या असें भारद्वाजी'च्या तेव्हांच लक्षांत जाल, व लगेच त्या शब्दाचा खरा अर्थ “शाक्तमताचा विशेष पंथ” अशी त्यास स्फूर्ति उत्पन्न झाली. इतक्यांत दुसरा एक चमत्कार झाला. तो हा का 'महालया शब्दाचा अर्थ 'मोहनीराज देव' असा डा. कुंट्यांनी केलेला दृष्टीस पडला. 'महालया' हे प्रत्यक्ष स्त्रीवाचक नाम असून त्याचा अर्थ 'मोहनीराज' असा पुरुषवाचक केलेला पाहन तरं "भारद्धाज' फारच चिडले, आणि लगेच कुट्यांची खोड मोडण्याचा त्यांनी निश्चय केला आणि कंबर कसून आपगापास धाव घेतली. आणि छेडा काढावयाला केली सुरवात. ईश्वराचा वरद हस्त ज्याच्या मस्तकावर त्याला कमी कोठे पडणार? तेथे त्या गांवची कुलस्वामिनी देवी आढळली. तिच्या देवालयाचा गांवकन्यांनी जीर्णोद्धार केलेलाही त्यांनी पाहिला. तेव्हां दर्शनासाठी भारद्वाज' आंत घुसले. तो दीडहात कोनाड्यांत देवीची मूर्ती ! ध्यान किती उग्र! हातांत खड्ग; सिंहावर आरूढ झालेली; गळ्यांत रुंढ; खालीं छिन्न विछिन्न होऊन पडलेले धड! हुवेहुब शाक्त भक्तांसाठी घेतलेला अवतार ! इतकें पाहिल्यावर संशय कसला! ज्ञानेश्वराच्या कपाळावर मारला शाक्ताचा शिक्का; बसविलें त्यांना मम्माच्या वाराखडीत, आणि ओढले आपल्या पंक्तींत न हूं काय? आतां शाक्तपंथ ह्मणजे काय, ह्याची आमच्या वाचकांस माहिती नसल्यास ती तुकारामांच्या अभंगावरून कळेल.. किंवा 'लोकवादी' कृत 'स्वाध्याय' पुस्तक पाहिले तरीही त्याचा खुलासा होईल. ह्या पंथांतली मुख्य गोष्ट ह्मणजे मद्य व मांस 'हा भक्ष्यभोज्य महानैवेद्य' होय! अशा वर्गात ज्ञानेश्वरासारख्या विभूतीला घालणे ह्मणजे कल्पनाशक्तीचा कडेलोट झाला !! नशीब बिचायचे! पण आधी ही देवी कोण? 'महालया' हिचें नांव आहे किंवा नाही ? मोहनीराज देव कोठे आहे किंवा नाही? त्याची हकीगत काय? ह्याचा तरी शोध करावयाचा होता? पण गुडघ्याला बाशिंगें बांधली नाहीत तर उतावळा नवरा ह्मणणार कोण? ह्याचें खुलासवार