या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. वर्णन पुढे येणार असल्यामुळे येथे येवढेच पुरे करतों; व 'भारद्वाजां'च्या चिंचेच्या पानावरील इमारतीस टेंकू देणारी ही दुसरी मेढही नीट ध्यानात ठेवण्याविषयी वाचकांची प्रार्थना करतो. 'भारद्वाजां'च्या मनश्चक्राच्या भिंगरीच्या तडाक्यांत जे जे काय सांपडले, तें तें त्यांनी बेलाशक बाहेर उडवून दिले. त्यांत काही विशेष असें आझांस वाटत नाही. परंतु त्यांच्या पाठीराख्यांनी व कैवाऱ्यांनी जो उताविळपणा प्रगट केला त्याचे मात्र राहून राहून कौतुक वाटते. भारद्वाजां'ची लेखणी ऐन दवडीत असतां 'सुधारक'कल्स मध्येच कड आला; व त्यांनी नेहेमाच्या सांप्रदायाप्रमाणे डा० फेअरबनच्या कासेस लागून भारद्वाजा'स मानपत्र देणाऱ्या आपल्या सामान्य व प्राकृत जनसमूहावरही यथाशक्त्या कोरडे ओढून घेण्याची संधि फुकट जाऊं दिली नाही. डा० फेअरबन ह्यांनी आपल्या व्याख्यानांत असे सांगितले की "आपला ग्रंथ समजून घेण्यास सत्यान्वेषणाच्या व इतिहासाच्या दृष्टीने आपणही कधी विचार करीत नाहीत्यामळे त्याविषयीं संगतवार ज्ञान होणे व त्या वेळची अवांतर स्थिति समज आपणास अशक्य होऊन बसले आहे." इतकी अक्षरे साहेब मजकुराच्या खातून पडली मात्र, की आपल्या जातिस्वभावाप्रमाणे 'सुधारक' बुवा लागल मागून 'रा' ओढावयाला. त्यांनी आपल्या ता २० मार्च सन १८९९ च्या अ कांत “हिंदु लोकांचा मोठा दोष" असे मोठे भव्य सदर घालून लागले त्यांची साथ करावयाला. ते ह्मणतात "हिंद लोकांमध्ये हा दोष अगदीच अक्षम्य आहे." [डा० फेअरबन ह्यांनी जेव्हां दिंडी दरवाजा उघडला, व आपली चाळशी 'सुधारक' बुवांच्या डोळ्याला लावली, तेव्हां तो स्वदेशबांधवांचा दोष त्यांच्या अंत:करणांत एकदम विशाल रूपाने प्रगट झाला, येवढेच नव्हे तर 'अक्षम्य 'तेस पात्र झाला, पण आजपर्यंत दिसेल तर शपथ! 'सुधारकांना पाठीचा कणा नाही; परकीयांच्या उसन्या कल्पनांचे भरलेलें तें एक पोतडें आहे.' असे में स्वामी विवेकानंदांनी झटले आहे, त्याची ही एक 'गरमागरम' साक्ष. सुधारकांनी लावलेल्या ह्या गोऱ्या विलायती चष्म्यांत आणखी एक विलक्षण गुण आहे. तो हा की, हिंदु लोकांच्या दोषांच्या रजाचा गज होऊन दिसतो. पण त्यांच्या गुणांच्या गजाचा रज सुद्धा त्यांत दिसत नाही. 'ओरीआन' सारखी चिकित्सक पुस्तकें प्रसिद्ध करून व आर्यलोक उत्तर ध्रुवाकडे असावेत अशी व्याख्याने देऊन रा. रा. टिळकांसारखे विद्वान् इतिहासाचे संशोधन करित