या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. आक्टोबर १८९९. २३७ आहेत. के. शंकर बाळकृष्ण दीक्षितांचे लेख, प्रस्तुत चालू असलेली 'भारतवर्ष' 'ऐतिहासिक लेखां'ची मासिक पुस्तकें ही सत्यान्वेषणाची, व इतिहासाच्या दृष्टीची दर्शक नव्हेतच का? पण 'सुधारकां'च्या विलायची चाळशीतील किरण तिकडे फिरकतात कशाला ? असो.] पुढें:-"प्राचीन ग्रंथाप्रमाणे आमच्या अगदी अर्वाचीन ग्रंथाविषयीही आमच्या कल्पना अत्यंत भ्रामक असतात. सुधारकाच्या एका लेखमालिकेंत भारद्वाज या सहीने ज्या एका मित्राने ज्ञानेश्वर व ज्ञानदेव ह्यांविषयी लोकांचा भ्रमनिरास (निरास का विकास ?) करण्याचा यत्न चालविला आहे, त्यावरून आपल्या अर्वाचीन कवि व साधुसंतवर्गाबद्दल आपला केवढा गैरसमज आहे हे कळण्यासारखे आहे." [होय. साधुसंतांवर आमचा विश्वास आहे; त्यांचे शब्द आह्मांला वेदतुल्य आहेत; त्यांच्यावर आमची देवाप्रमाणे पूज्यबुद्धि आहे. हा आमचा 'अक्षम्य 'गैरसमज ह्यांत काही शंका नाही. सुधारकवर्गाच्या नखाची सर साधुसंतांना येणार नाही. असे असतां सुधारकवर्गाच्या चरणारविंदी मिलिंदमान व्हावयाचे सोडून आझी साधुसंतवर्गाच्या कासेस झट्या खात बसतों, हा आमचा केवढा बरें गाफिलफणा ! ह्याबद्दल आमांस आतां कोण क्षमा करील तो करो.] ह्यापुढे 'भारद्वाजां'स आलेली अभिनंदनपर पत्रे 'सुधारकां' त दाखल केली आहेत. ती अशी: "भारद्वाजाची माहिती व विद्वत्ता वाखाणण्यासारखी आहे; शोध प्रशंसनीय आहे व त्याने आपले झणणे चांगली प्रमाणे देऊन सिद्ध केलें आहे." अशा अर्थाची पत्रे आह्मांकडे ना० रानड्यांसारख्या विद्वद्रत्नांकडून आली, व एकनाथाच्या दुरुस्तीच्या आधींची ज्ञानेश्वरी कशी होती याचा शोध लागल्याने 'जन्माच्या अनेक नादांपैकी एक नाद पुरा झाला' असें वाटून आनंद झाल्याचेही त्यांनी कळविले. परंतु या एक दोन सामान्य अपवादाशिवाय सामान्य जनसमूहास त्या विषयाचे वाटावे तसे महत्व वाटत नाही. ही गोष्ट कशाची साक्ष देते ?” ह्यामध्ये 'सुधारका'चा केवढा उताविळपणा दिसून येतो ते पहा. हा लेख आला त्याच्या पूर्वीच्याच अंकांत 'भारद्वाजा'चा नववा लेख पुरा झाला होता. व त्याच्या शेवटी "पुढील अंकांत भाषासरणीविषयी विचार करूं" हे वाक्य होते. तेव्हां 'भारद्वाजा'ची लेखणी भरवेगांत असून तिची दौड कोठपर्यंत