या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जाणार हे समजण्याला काही मार्ग नव्हता. तेव्हा त्यांचे हाणणे पुरतें ऐकून घेतल्यापूर्वीच त्याचे महत्त्व' दर्शवावयाचे कसे ? 'भारद्वाजा'च्या फडाचे गु-हाळ चालू असतां, दुसऱ्याने शेंगांचे खणित लावावयाचें केव्हां ? 'सुधारका'च्या मत 'भारद्वाजा'च्या मुखांतून एक वाक्य बाहेर पडले पुरे की 'सामान्य जनांनी एकत्र जमून 'हा: ! हो:!' करून बाजार मांडावा आणि आपले महत्व प्रदर्शित करावें, असें असेल तर मात्र न जाणों. बाकी, थोड्या अवकाशाने दहा पांच मंडळींनी 'केसरी'तून यथाशक्त्या यथामत्या 'भारद्वाजांची काय थोडीबहुत पूजा करावयाची ती केलीच आहे. म्युनिसीपालिटीच्या मेंबरांप्रमाणे 'आमचे परम दयाळू विद्वान् रावसाहेब मामलेदार ह्यांच्या मताप्रमाणेच माझेंही मत' असा मंत्रजप मात्र कोणी सामान्य जनांनी केला नाही, ही मोठी दुःखाची गोष्ट होय. 'सुधारका'ने ना० रानड्यांचा जो अभिप्राय पुढे आणला आहे, तो जर खरा असेल, तर त्याहून आश्चर्यजनक गोष्ट दुसरी कोणतीच नाही. अशा रीतीचा अभिप्राय इतक्या घाई घाईनें नामदारासारख्यांच्या लेखणीतून उतरण्याच कोणत्याही रीतीनें संभवनीय दिसत नाही. 'भारद्वाजा'ची माहिती, विद्वत्ता वाखाणण्यासारखी आहे; व शाध प्रशंसनीय आहे. आपेगांवच्या देवीच्या नांवाचा शोध न करितां तिला पाळण्यात घालून 'महालया' नाम ठेवणे. आपेगांव गोदावरीच्या उत्तरतारा आहे ह्मणून दक्षिण लिंगी' ह्याचा अर्थ 'शाक्तांचे विशेष मत' हाणून तर्क करणे इत्यादि "भारद्वाजा'ची माहिती व शोध वाखाणण्यासारखी व प्रशसनीयच खरी! पण पुढील वाक्याचा जोर पहा:-" त्याने आपलें मगण चांगली प्रमाणे देऊन सिद्ध केले आहे.' 'भारद्वाजा'चा लेख पुरा संपूर्णही झाला नाही, तोच त्याने दिलेली प्रमाणे 'चांगली' आहेत, हे नामदारसाहेबांना कळले कसे ? लेख पुरा होऊन दसऱ्या बाजूची प्रमाणे पुढे येऊन ती पाहून त्यांची शहानिशा करून मग जर 'भारद्वाजा'चीच 'प्रमाणे चांगली आहेत' असें मटले असते तर त्यांत कांही तरी तथ्यांश असता. बरे, दुसप्यावर अवलंबून न राहतां स्वत:च आळंदी, आपेगांव, नेवाशाकडे मजल मारून तेथील ग्रंथ चाळून त्यांची शहानिशा करून, नामदेव, जनाबाई, निवृत्ति, नाथादिकांचे अभंग वगैरे नजरेखाली घालून, ज्ञानेश्वरीचे सूक्ष्म रीत्या पारायण करून न्याय देण्याची झटपट इतक्या तडकाफडकी उडविली असेल हेही सयुक्तिक दिसत नाही. तेव्हां हा चमत्कार काय ? पण घोडा