या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० केरळकोकिळ, पुस्तक १३ वे. मची प्रस्तावनाच फार लांबली. ह्याकरितां आतां तीस रजा देऊन भारद्वाजांच्या प्रत्येक मुद्याच्या विचारास लागू या. केसरी' वर्तमानपत्रामध्ये सात आठ शोधक गृहस्थांनीं 'भारद्वाजांच्या लेखांचें आपआपल्यापरी खंडन केले आहे. कोणी नामदेवाची व ज्ञानेश्वराची आदिपरंपरा शोधून ती दिली आहे; कोणी आपेगांवची व नेवाशाची असलेली माहिती सांगितली आहे; कोणी नामदेवाचे व एकनाथाचे अभंग वगैरे देऊन आपल्या विषयाला पुष्टी आणली आहे. ते सर्व ठीकच आहे. परंतु प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच सूक्ष्म रीतीने चाळून 'भारद्वाजांच्या अज्ञानाचे माप मात्र जितकें हडसून खडसून कोणी पदरांत घालावे तितकें कोणी घातलेले दिसत नाही. ती उणीव भरून काढण्याचा ह्या लेखाचा प्रधान हेतु आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठा; विषय गहन; भाषा जुनी-अर्थात् दुर्बोधः तेव्हां तो नीट समजून घेऊन त्याचे प्रतिपादन करण्याचे काम चटकन् उरकण्यासारखे नव्हे. ह्मणूनच तो भाग बहुतेकांकडून सुटला गेला. प्रस्तुत लेखक ज्ञानेश्वरीचें गद्यात्मक सरळ समग्र भाषातर करीत असून तो ग्रंथ छापूनही परा होत आला आहे. त्या सवाल ज्ञानेश्वरी आज सतत दोन अडीच वर्षे त्याच्या डोळ्यांपुढे आहे येवढेच नव्हे तर ती त्याच्या हृदयांत घोळते आहे. तिच्यांतील बरेच हृद्गत त्याच्या प्राधशा प्रमाणे अंत:करणांत ठसलेले असल्यामळे भारद्वाजांसारख्याच्या भ्रामक कल्पनांचा निरास करण्यास त्याने उत्सक होणे हे जसें साहजिक तसेंच आवश्यकही आहे. तरी 'भारद्वाजा'च्या प्रत्येक मयाचा विचार करावयाचा तो क्रमाक्रमानेच करावयाचा आहे. ह्मणजे वर निर्दिष्ट केलेला मुख्य हेतुही विषयाच्या ओघानुसार बाहेर येईल. इतकें सांगून ठेवून भारद्वाजां'चा एक एक मुद्दा हाती घेता. 'भारद्वाजां'चा पहिला सिद्धांत हा की नामदेव व ज्ञानेश्वर समकालीन नव्हते. ह्याला त्याच्याकडून पुरावे आले आहेत ते:-(अ) नामदेवाच्या अभंगात व चरित्रांत नामदेवाचा जन्म शके ११९२ प्रभवनाम संवत्सरी लिहिला ती चूक होय. कारण प्रभव नाम संवत्सर ११८९ शकामध्ये येतो. ११९२ मध्ये येत नाही. (पुढे चालू.) PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.