या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १३] अं० ११ dowom जेब्रा. AVADYAN जेब्रा हा गाढवाच्या वर्गातील एक प्राणी आहे. परंतु रत्न हे दगडाच्याच वर्गातील असून, त्या परस्परांत जसें जमीनअस्मानाचे अंतर, त्याचप्रमाणे गाढवामध्ये आणि जेन्यामध्ये महदंतर आहे. गाढव जितकें पेवळट, मलीन व मदाड दिसते, तितकाच जेब्रा पाणीदार, देखणा, सतेज व चलाख असतो. दक्षिण आफ्रिकेंतील मध्यप्रदेश हे ह्या प्राण्याचे वसतिस्थान आहे. जेब्रा हा मोठा ऐटबाज पशू असून दिसण्यामध्ये फारच सुंदर व उमदा असतो. ह्याच्या आंगावरचे केस, रेशमाप्रमाणे तकतकीत व मखमालीप्रमाणे मऊ असतात. ह्याचा रंग पांढरा असून त्यावर वाघाप्रमाणे काळे पट्टे असतात. पण ते इतके व्यवस्थित असतात, की त्यामुळे त्याच्या आंगाला एक प्रकारची विलक्षण शोभा प्राप्त होते. पायावरचे पट्टे तर इतके मनोहर असतात की, त्याच्या पायांला जणों काय मुद्दाम कडींच घातली आहेत असे वाटते.