या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. कलीचा दरबार, आर्या. विमला कमलासम तनु, फारचि सुकुमार, अन्नहि न जेवी। सेवी क्षणक्षणीं जी, ज्ञानरसा अल्प कल्पनादेवी ॥१॥ परमोड्डाणपटुत्वे वेगवती, वायुशी जगत्क्रमणीं । रमणीय जिची करणी, त्रिभुवनसंचारिणी मनोरमणी ॥ २॥ चपला पलांत गगनीं, मग निमिषे जगभरी करी गमना । श्रम ना दम लेश जिला, भीति तशी विश्व हिंडतां न मना ॥ ३ ॥ पाताळी निमिषार्धे, सुरलोकी शीघ्र तेंवि जी पावे । फावे न पळहि, तिळभरि खळ न पडे, चपळ सारखी धांवे ॥ ४ ॥ जंव ती कवणे समयीं क्रमण करी यापरी पुढे देवी । नगरी अमरपुरीसम रमणीय बघोनि त्यांत पद ठेवी ॥ ६ ॥ लावी नेत्र, पवित्र क्षेत्र दिसे रम्य तो अनघराशी। पुसतां कोणांस, 'तुह्मी आला' सांगति 'विचारनगराशी' ॥६॥ मणती माविक बघुनी, क्षेत्र असें, फुकट चाललों काशी। खाशी त्यजनि अशी कां, आवडते बिकट चाल लोकांशीं ॥ ७ ॥ जाऊं ह्मणे, पुढे ती शोभा नगरा जरा चला पाहूं। राई क्षण, लावू मन, पाहूं जनरीत, रंजना लाई ॥८॥ राहे पाहे सुंदर शुभ्र यशोमंदिरें चिरेबंदी। छंदी स्वानंदभरें डोले, जणुं नंदिकेश्वरा नंदी ॥९॥ उद्याने बहु सुखकर, शीतल तनु तप्त त्यामुळे शमली । कमलीं भ्रमरासम ती, हृदयंगम पाहुनी मनी रमली ॥ १० ॥ होती प्रफुल्ल विस्तृत नवपल्लवयुक्त वल्लरी-वृक्ष । छाया भली रमाया, गार जणों भारले तिने लक्ष ॥ ११ ॥ चित्रविचित्र मनोरम सुमनीं परिमळ जनीं वनीं भरुनी। तरुंनी फलभार मधुर, वरिलें उपकारतत्व अनुसरुनी ॥ १२ ॥