या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रम्य सरोवर 'मानस', लाजवि शरदिंदुला जलें विमलें । कमले प्रफुल्ल, षट्पदवृंदहि मकरंदसेवनी रमलें ॥ १३ ॥ बुडती वृक्षांखाली कारंजी उंच सारखी धार । गार किती पुष्करणी, पार न आल्हाददायिनी फार ॥ १४ ॥ पाहत पाहत गेली, यापरि देवी पुढे पुढे जंव ती। पाहे अनुपम शोभा, अधिकाधिक पाहिलीच जी नव्हती ॥ १५ ॥ पाहे प्रासाद भला, रत्नखचित जो सुवर्ण नयनांहीं । शिखरे सुप्रभ वरती ध्वज सुंदर चिर जयां विलय नाहीं ॥ १६ ॥ तंव नवल फार वाटे, दृष्टी जो धवल तोरणे पडलीं । जडली क्षणैक वृत्ती, गतती गुंगती तशी गढली ॥ १७ ॥ तो कलकलाट आला, 'पैस चलो रे चलो चलो' कानी । केला घोष 'चिरायू होउं महाराज' तोंच लोकांनी ॥ १८ ॥ 'राजाधिराज ! बलवान् ! 'कर्तुमकर्तु'! सदा विजयशाली !' 'आस्तेकदम चलाना' ललकारत भालदार त्या कालीं ॥ १९ ॥ कोठे. कोण, कशास्तव करिती गडबड असें असे काय ? गायक, नायक नाना, काय कुठे जाय लोकसमुदाय ॥२०॥ पुसतां कोणास असें, सांगति सानंदवृत्त हे भारी । दरबार आज मणुनी, रायाची चालली असे खारी ॥ २१॥ धीमंत, भाग्यशाली, सकलैश्वर्य प्रतापसंपन्न । अन्य न धन्य असा प्रभु, की ज्याची राज्यरीतिही भिन्न ॥ २२ ॥ (पुढे चालू.) दोन मित्रांचा अखंड वियोग!! आमच्या ह्या हतभागी देशाचे मागें अनर्थ, उत्पात, संकटें जणों काय हात धुऊन पाठीस लागली आहेत असे दिसते. पण त्यांत प्लेग महाराजांचा नंबर अगदी पहिला. ह्या बुवांचे पोट केवढें, भूक किती.