या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २४६ प्रतील तेव्हा वळ वाघाच्या गुहा ठिकाणच्या मृत्यज्यांशी आपला । व ढेकर कधी देणार त्याचा कांहीं पत्ता लागत नाहीं ! अखेरीस ह्यांच्या भक्ष्यस्थानी पडल्यावांचून कोण कोण उरतात, कां कोणी उरतच नाहींत, ईश्वर जाणे! असें पुण्यामुंबईसारख्या शहरांस वाढू लागले आहे. हा प्रत्यहींच जर बकासुराप्रमाणे शेकडों मनुष्यांचा फन्ना उडवित आहे, तर तसें कां न वाटावें ? कारण, ह्या दोन शहरांत-त्यांतून पुण्यांत तर कहरच-'हं, आज कोण कोण लागले ? आणि कोण कोण गेले ? हे प्रश्न व उत्तरें, आणि रात्रंदिवस हृदयांत 'चिंतेची शेगडी' पेटलेली. ऑफिसांतून घरी जाईपर्यंत तेथे काय असेल कोण जाणे ? बायका ह्मणतात सायंकाळी पुरुष धडपणी घरी येतील तेव्हां आमचे. ह्मणजे हल्लीच्या प्रसंगी पुणे, मुंबई, नासीक, इत्यादि शहरें केवळ वाघाच्या गुहा; सर्पाची बिळे; आणि विंचवांची पेवे बनून राहिली आहेत. अशा ठिकाणच्या मृत्यूंच्या बातम्या लि. हावयाच्या तरी किती ह्मणून ? पण त्यांतल्या त्यांत ज्यांशी आपला विशेष परिचय झालेला असतो, ज्यांच्या मूर्ती डोळ्यांसमोर उभ्या असतात; ज्यांचे गुण सर्वत्र पसरलेले असतात, अशा निवडक मित्रांविषयीं व सद्गृहस्थांच्या निधनवृत्ताचे दोन शब्द तरी लिहिल्यावांचून रहावत नाही. ह्मणून आज दोन सद्गृहस्थांचे निधनवृत्त परमदुःखानें आमी आमच्या वाचकांस कळवित आहों. १ रा. रा. रघुनाथ गोपाळ ऊर्फ तात्यासाहेब देशमुख-हे सरदार बहादूर गोपाळराव हरी देशमुख ह्यांचे चतुर्थ चिरंजीव होत. हे बी. ए. पदवीधर असून हायकोर्टात ट्रान्स्लेटरच्या जाग्यावर होते. ह्यांचा स्वभाव फार गंभीर व धैर्यशील होता. हे मितभाषणी असत, तरी त्यांचे विचार फार खोल होते. ह्यांची शरीरसंपत्ति प्रथमपासूनच फार सदृढ होती. निजतांना उशाकडे दोहों बाजूस दोन दगडांच्या मणक्या घेऊन निजावयाचे. आणि उठतांना दोहों हातांत धरून त्या तशाच वर घेऊन उठावयाचें ! मरणास ते कधीही भीत नसत. 'जातस्य हि ध्रुवो मृत्युः' हे वाक्य नेहेमी त्यांच्या तोंडांत असे. मुंबईत प्रथमच्या खेपेस जेव्हां प्लेगनें अगदीं कहर उसळून दिला, तेव्हां तमाम लोक शहर सोडून दूर दूर राहिले होते. पण तात्यासाहेब मुंबईत आपल्या वाड्यांत एकटेच राहत असत. आणि तेही अगदी आनंदात !