या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. त्याची हकीकत एके दिवशी त्यांनी आमांस समक्ष सांगितली. ते मणाले "त्या वेळी कोणी स्वयंपाकाला ब्राह्मण राहीना; चाकर मिळेना; फार तर काय पण भांडी घांसावयापुरतें सुद्धा माणूस नाही. तेव्हां सर्व कामें मी एकटाच करी. आणि घरामध्ये मी एकटाच राही. रात्री लौकर जेवण करी, आणि गच्चीवर जाऊन वाचीत बसे. गल्लीत, शेजारी, की रस्त्यावर एक चिटपाखरूं नसे. अहोरात्र लमाप्रमाणे गजबजणारी मुंबई सायंकाळचे सहा वाजले की, निर्जन अरण्याप्रमाणे शून्य व भयाण दिसूं लागे. मधून मधून प्लेगची भेसूर प्रेते चाललेली मात्र दृष्टीस पडत." ह्यावर आम्ही त्यांस विचारले "आपणांस हा सर्व देखावा पाहून भीति, दहशत कांहींच वाटत नव्हती काय?" तात्यासाहेब ह्मणाले "कांही नाही. मला एक क्षणभरही कधीं भीति वाटली नाही." इतके ते खंबीर मनाचे होते. तरी सुद्धां प्लेगनें त्या च्यावर झडप घातलीच. प्रथम त्यांच्या घरांत उंदीर मेलेले काणा दाखविले. तेव्हां तात्यासाहेब त्यांस ह्मणाले "असली भागुबाईपणाचा लक्षणे माझ्या पुढे आणूं नका. प्रत्येक प्राण्याला मरण हे आहेच. ह्यांत विशेष ते काय ? उंदीर मेला! झुरळ मेले! मांजर मला घाबरली मंडळी! किती हा भित्रेपणा!" गेल्या महिन्यातील एका शनिवारी त्यांस थंडी वाजून ताप भरला, ह्मणून ते हायकोर्टीतून निघून घरी गेले. रविवारी त्यांस गांठ उठली. तेव्हां तत्काल हा प्लेगच अशी खात्री झाली. तेव्हां त्यांनी लगेच दौतलेखण घेऊन स्वतः आपली सर्व जिनगी तीन मुलगे व कुटुंब ह्या चौघांस यथाविभाग वाटून देऊन त्याबद्दल मृत्युपत्र करून ठेवले. त्यांचे वडील चिरंजीव बी. ए. आहेत. ते हा प्रकार पाहून 'इतकी घाई कां करितां' असें ह्मणाले. त्यावर त्यांनी उत्तर दिले "छे! तुला समजत नाही. आतां कांही नेम नाही, व या पुढे माझें चित्त स्थिर राहणार नाही. ह्याकरितां हेच ठीक आहे." असें ह्मणून त्यांनी कुटुंबांतील सर्व मनुष्यांचा फार धैर्याने निरोप घेतला. तो हॉस्पिटलांत जाण्याची तयारी पाठीस लागलीच. त्याप्रमाणे ते हॉस्पिटलांत गेले; व त्यांचा ताप, गांठ वगैरे चढत चालली. त्यांचे धाकटे बंध डा० नानासाहेब देशमुख एम्. डी. हेही जवळ बसून उपचार करीत होते. तेव्हां आपल्या प्रिय बंधूची