या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २६३ स्थिति आहे. झणजे इंग्रजीतील W ह्या अक्षराप्रमाणे त्यांस स्वरही ह्मणतां येतील, व व्यंजनेंही ह्मणतां येतील. ऋ हे व्यंजन असें हणण्याला फक्त एकच प्रमाण आहे. ते हे की, त्यांतील रकाराचा उच्चार किंचित् -हस्व होतो. द्विवेदी ह्मणतात त+कर (व्ह नव्हे) मिळून तृ होतो. होय. परंतु ऋमध्येच रकार आहे हे विसरता कामा नये. आणि त्यांतील रचा मागील व्हस्व अक्षरावर आघात होतो, ह्यांतही काही संशय नाही. ह्या सर्वांचा विचार केला झणजे तृ, दृच्या पाठीमागच्या -हस्व अक्षरास द्वित्त्व देणार कवि दोषास तर पात्र होत नाहीच, पण न देणारा कवीच एका अर्थाने अधिक दोषी होईल. आतां कर्मनिष्ठ ब्राह्मणांप्रमाणे ज्यास आपल्या काव्यांत येवढाही दोष ठेवणे इष्ट वाटत नसेल, त्याने तृ, दृ इत्यादि ऋकारयुक्त अक्षरें हस्व अक्षरापुढे कधीच आणूं नयेत हा मार्ग उत्तम होय. इतकाच आमचा अभिप्राय आहे. रा. द्विवेदी ह्यांनी आमच्या लेखांचें व कवितांचे अभिनंदन केल्याबद्दल आझी त्यांचे उपकारी आहोत; व त्यांनी असेंच मार्मिक अवलोकन करून कमीजास्त कळवित जाण्याविषयी त्यांस प्रार्थनाही आहे. वादग्रस्त गोष्टींचा ऊहापोह होणे, दोषांचा खल होणे ह्या गोष्टी सदासर्वदा उपयुक्तच आहेत, ...... -ए० के० को० राजयोगाबद्दल शीवाला रा.रा. रघुनाथ केशव खरे, 'केरळकोकिळ वर्गणीदार-गुलसराई-हे लिहितात:"सा. वि. वि. चालू वर्षाचे 'कोकिळ'चे अंक पोंचले. फार दिवसांपासून १. रसिकवर्य कै. परशुरामपंत तात्या गोडबोले, ह्यांनी शब्दांच्या गुरुत्वाविषयी छंदःशास्त्राचा जो नियम ‘वृत्तदर्पणां'त सांगितला आहे, त्यावरूनही वरील प्रकाराचा चांगला निर्णय ठरतो. त्यांनी येणेप्रमाणे मटले आहे: "प्राकृतांत तुह्मी ह्या शब्दाचे दोन उच्चार आहेत, ह्मणजे एक 'तु' वर आघात देऊन आहे, व दुसरा त्याशिवाय आहे. जेव्हा आघात असतो, तेव्हां 'तु' ह्या हखाक्षराला गुरुत्व येतें, आघात नसतो तेव्हा येत नाही. तात्पर्य की, संयुकाक्षराच्या योगाने मागील हस्वाक्षराला गुरुत्व येणं हे त्याच्या आघातावर आहे-प्राकृत शब्दांत कित्येक ठिकाणी आघात येतो आणि कित्येक ठिकाणी येत नाही ह्मणून गुरुत्व निश्चित नाही."