या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २४७ अशा प्रकारची अकस्मात् हताश स्थिति झालेली पाहून त्यांच्या नेत्रांतून अश्रु आले. ते पाहून तात्यासाहेब शांत वृत्तीने ह्मणाले "इतकें वाईट वाटण्याचे कारण नाही. मृत्यु हा कोणासच सुटावयाचा नाही." नंतर मानेच्या मागे हात लावून ह्मणाले, "मृत्यु हा नेहेमी मनुष्याच्या मार्ग उभाच असतो. तो केव्हां तरी पुढे येणारच. मग आज काय आणि उद्यां. काय ? त्याबद्दल कधीच कोणी वाईट वाढू देऊ नये." अशा शांत वृत्तीने त्यांनी आपला मंगळवारी देह ठेवला!! रा. ब. गोपाळराव हरी ह्यांस सहा चिरंजीव असून ते एकाहून एक सुजन, व विद्वानांत केवळ अप्रतिम रत्ने असे होते. त्यांपैकी आतां प्रसिद्ध डाक्टर नानासाहेब, व लोकप्रिय अ. कलेक्टर रावबहादर अप्पासाहेब हे दोघेच काय ते शिल्लक राहिले. बाकी सर्व ऐन उमेदीतच इहलोक सोडून गेले! ईश्वराची इच्छा! आतां ह्या उभयतांस तरी ईश्वराने दीर्घायु करावे, अशी आमची मनोभावे जगदीश्वरास प्रार्थना आहे, ती तो सफळ करो, मित्र तात्यासाहेबांच्या आत्म्याला निरंतर शांति देवो, व त्यांच्या द्वितीय पत्नीला व त्रिवर्ग पुत्रांना व उभय बंधूंना दुःखाचें सांत्वन करण्यास धीर देवो, येवढी प्रार्थना करून हा दुःखदर्शक लेख संपवितो. २ रा. रा. वामन बाळकृष्ण रानडे-पुण्याच्या ज्ञानचक्षु' पत्राचे एडिटर. हेही लेखनपटु गृहस्थ भर उमेदीत असतां, गेल्या महिन्यांत प्लेगर्ने वारले. हे गृहस्थ लहानपणापासून रा. ब. गोपाळराव हरी देशमुख ह्यांच्या हाताखाली त्यांच्या पुस्तकलेखकाचे काम करून चांगले प्रवीण झाले होते. 'ज्ञानचक्षु' व ठाणापंच ह्या दोन वर्तमानपत्रांमध्ये ते लेख लिहित असत. पंचपत्रांतील ह्यांची विनोदात्मक भाषा, व चुटके इतके चटकदार असत की, आबालवृद्ध ते ऐकावयास उत्सुक होऊन रहात. असे विषय व कल्पना नव्यानव्या शोधून काढण्याची हातोटी त्यांस उत्तम साधली होती. साहजिक जरी त्यांच्या बरोबर कोणी क्षणभर संभाषण करूं लागला, तरी ते त्यास हांसवून हांसवून पुरे करीत. ह्मणजे त्यांचा स्वभाव मूळचाच विनोदी होता. ज्ञानचक्षूत थोर थोर लोकांची चरित्रे मिळवून ती छापण्याचे काम सुरू केले होते. ह्या पत्रांत 'सायन्टिफिक अमेरिकन' सारख्या वर्तमानपत्रांतून वगैरे