या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. घेतलेले निवडक चमत्कारिक लेखही नेहेमी वाचण्यासारखे असत. हे बहुधा प्रत्येक राष्ट्रीय सभेला जाऊन, तेथची अनुभविक माहिती 'ज्ञानच 'तून प्रसिद्ध करीत. तीही वाचण्यासारखी असे. ह्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रभाषेतील चांगला लेखक नाहीसा झाला. आणि दोन पत्रांची बरीच हानि झाली आहे. वामनरावजींसारखे चित्तवेधक लेख 'पंचा'मध्ये आतां कोण देईल तो देवो! ह्यांचे मरणही अल्पवयांतीलच आहे; व त्यांच्या मागे त्यांची द्वितीय पत्नी आहे. त्यांच्यावर हा दुःखाचा पर्वत कोसळला हे सांगणे नकोच. ह्या आमच्या मित्राच्या व व्यवसायबंधूच्या आत्म्यास परमेश्वर अखंड शांति देवो. पुस्तकपरीक्षा. संगीत मालविकाग्निमित्र नाटक- कालिदास कविवर्याचे संस्कृत पुस्तकाचे भाषांतर ] हे पुस्तक रा. रा. वामन गणेश जोशी केळशीकरसगीत बलिसत्वदर्शन नाटक, संगीत सत्यवानसावित्रीचरित्र, या पुस्तकांचा कता-यांनी केले. त्याची सादर स्वीकृति करून पुष्कळच काल लोटला. ह्यास्तव कालावधीबद्दल पुस्तककर्त्यांची क्षमा मागून कर्त्यांच्या सदिच्छेप्रमाणे 'दुसऱ्या पुस्तकांत सुधारणा करण्यास मिळेल ' अशा प्रकारचा अभिप्राय स्थलकालानुसार आज देत आहो. कोणताही धंदा करावयाला ह्मणा, की पुस्तक लिहिण्याला ह्मणा, आरंभ करावयाचा तर आधी पुष्कळ गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. त्यांत हटकून यश येईल, अशा प्रकारच्या जेवढ्या जेवढ्या ह्मणून तजविजी आहेत, तेवढ्यकिरितां घेववेल तेवढी खबरदारी घेतली पाहिजे. काही तरी करावयाचे झणून करावयाचें, ' येन केन प्रकारेण ' प्रसिद्धीस यावयाचे, हा पोकळ अभिमान निखालस वयं केला पाहिजे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करणे, हा शुद्ध बुद्धिमत्तेचा कमकुवतपणा आहे. जगांतील कोणतेही कार्य, बहुधा अनुकरणावांचून नाही, हा सिद्धांत जरी खरा आहे, तरी, त्यांत कांहीं तरी आपल्या बुद्धिमत्तेचे नवीनत्व नसेल, तर ती कृति लोकादरास पात्र होणे, तिचा गौरव होणे, तिची कीर्ति पसरणे ह्या गोष्टी केवळ दुरापास्त होत. उत्तम पुस्तक एकच जरी लिहिले तरी त्याची योग्यता, गाबाळग्रंथी लिहिलेल्या हजार पुस्तकांहूनही अधिक