या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. महाराष्ट्रकोकिळ ' फडकलाच. 'महाराष्ट्रकोकिळ ' निघतो न निघतो, तों 'भारतकोकिळ' गर्भातच लागला 'हुंकार' द्यायला ! केसरी पुढे आला, तो 'पंचानना ने डोके वर काढलेच ! हे कशाचे द्योतक ? पण ह्यामध्येही एक गोष्ट ल. क्ष्यांत ठेवण्यासारखी आहे की, प्रथमचा जो पुढारी असतो त्यालाच अग्रमान असतो. आणि ही मागाहून रखडणारी मंडळी बहुधा उपजतच अस्तास जाते, किंवा फारच झाले तर 'झ्या इयां' करून रखडत बसते. इतकेंच, त्यांतील एखादा तरी, शर्यत जिंकून पुढे आला आहे, असें उदाहरण क्वचितच ! असें कां ? तर ह्या अनुकरण करणाऱ्या लोकांकडून एक मुळांतच चुकी होत असते. ती चुकी हणजे ही की, त्याच्यामध्ये लागणारे 'नवीनत्व' व 'सरसत्त्व ' हे जे बीज, त्यांचा त्यांजपाशीं मुळीच अभाव असतो. त्यामुळे: कणेवीण बा सोपटें । कणसें लागली अति घनदाटें। काय करावे ते गोमटें। ओस नगर ॥ १ ॥ अशी त्यांच्या कृतीची अवस्था होते. तेव्हां एकंदरीत काय, की कोणत्याही अनुकरणीय कृतींत-अनुकरणाशिवाय कृति अशी कोणती आहे ?-नवीनत्व व सरसत्व असल्याशिवाय, तेज पडण्याला कोणताच मार्ग नाही. विचारांत, शब्दांत, अलंकारांत, चमत्कृतींत, तालसुरांत, रागरागिणींत, काही तरी नवीनत्व पाहिजे. नाही तर उसांच्या चिपाडांचा आणि त्यांचा भाव सारखाच ! पण त्यांत आणखीही एक मार्ग आहे. तेवढा साध्य झाला, तरी सुद्धा बराच कार्यभाग होतो. तो मार्ग हा की, ज्या कृतीचे अनुकरण करावयाचे, त्या कृतीशी अगदीं सदृश तरी नवी कृति उतरावी. उदाहरणार्थ संगीत नाटकच का होईना ? तें जरी दुसऱ्या एखाद्या संगीताचे अनुकरणच असलें, व त्यांत रागरागिणी जरी त्याच असल्या तरी, शब्दमाधुर्य, अर्थगौरव, व विचारसौंदर्य हे तरी नवें असतेंच. आणि तेवढ्यानेही रसिकजनांचे मन सुप्रसन्न झाल्यावांचून रहात नाही. समजा, की " झाली ज्याची उपवर दुहिता" ह्या किर्लोस्करांच्याच पदाच्या चालीवर दुसरे एखादें तसलेच पद करून, त्यांत जर " दुर्व्यसनी पुरुषाच्या स्त्रीची स्थिति" वर्णन केली, आणि ती जर वरच्याच पदांतील वर्णनाप्रमाणे हुबेहुब वठली, तर तें पद जुन्या चालीवर असूनही श्रोत्यांस तल्लीन केल्यावांचून रहाणार नाही. पण ही दोन्हीही ज्यास साधत नाहीत. त्याची फारच दुदेशा होते. कारण, साधारण मलिन वस्त्र सुद्धा परीटघडीच्या जवळ ठेवले हणजे ते जसे काळे कुट्ट दिसू लागते, त्याप्रमाणे ज्याचे