या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २५१ अनुकरण केलेलें, ती कृति डोळ्यांसमोरच असल्यामुळे, ह्या नव्या कृतीतील दोष अधिकच स्पष्ट दिसून ती अधिकच तिरस्कारास पात्र होते. ह्या संगीत नाटकरचनेसंबधाने ठोकळ गोष्टी सांगितल्या. आतां साधारणपणे काव्यांत कोणकोणते दोष न होण्याविषयी जपावें, याचेही थोडेसें दिग्दर्शन करतो. (१) संगीत नाटक रचणाऱ्या कवींपैकी, बहुतेकांस छंद, छंदःशास्त्र, मात्रा, गण, यति, वृत्त इत्यादि ज्ञानाचा बहुतेक अभावच असतो असे दिसते. श्लोक, साक्या, दिंड्या ह्याप्रमाणे पदाला मात्रा, गण, -हस्वदीर्घ, ह्यांचे फारसें बंधन नसल्यामुळे पर्दे काय? पूर्वीच्या चालीप्रमाणे रचलीं ह्मणजे झालें.' असा त्यांचा समज असतो. ह्मणून व्हस्वांची दीर्घ, व दीर्घाची व्हस्व अक्षरें करून, पाहिजे तेथे स्वर चढवून व उतरून, हव्या त्या मात्रांचा संक्षेप व वि. स्तार करून आपल्या काव्यांत ते पाहिजे तशी दडपादडपी करून सोडतात ! ते स्वतःच जेव्हां गात असतील, तेव्हां ते स्वेच्छेप्रमाणे पाहिजे तेथे लांबआं. खूड करून तोंडमिळवणी करून घेत असतील. परंतु वाचकांस कवीचें हें गुप्त मनोगत समजण्यास मार्ग नसल्यामुळे, तें ह्मणतांना शुद्ध भांबावण्याचीच पाळी येते. पदाच्या माथाळ्यावर पहावें तो 'वस्त्राने देह सारा सुंदरिने झोकिला' ही चाल दिलेली. आणि खाली दिलेल्या पदांतील एक चरण त्या चालीवर ह्मणावयाला येईल तर शपथ ! नूतन संगीत कवींना असे वाटतें की, आगगाडी सडकेवरून चालते, ह्मणून तिला रूळावरून जाणे भाग आहे. पण समुद्रांत कांहीं रूळही नाहीत, व सडकही नाही. तेव्हां गलबताला बंधन कशाचें ? ते कोणीकडेही झुकले तर चालेल. तशीच गोष्ट संगीताची. मात्रागणाची, छंदःशास्त्राची, हस्वदीर्घाची जी काय बंधने ती श्लोक, आर्या इत्यादिकांना. पदाशी त्यांचा काही संबंध नाही. परंतु समुद्रांत जरी सडक नाही; तेथें जरी रूळ मारलेले नाहीत, तरी गलबतानें किनारा सोडून बहकतां नये; ध्रुवनक्षत्र सोडतां नये; व होकायंत्राची दिशा चुकवितां नये. ही गोष्ट ते विसरतात. वृत्ताप्रमाणे पदाला जरी रूल नाहीत, तरी त्यालाही दिशेची बंधनें आहेत. त्याला मात्रा हव्यात; त्याला हस्वदीर्घ हवें: त्याला शब्दलालित्य हवें; सर्व काही हवें. तें सोडून दिले, तर तें पद दिलेल्या चालीवर धडपणी झणतां सुद्धा येत नाही. (२) काव्यामध्ये-मग तें संगीत असो की वृत्तबद्ध असो-त्यांतील रसास अ