या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नुकूल अशी कोमल, कठोर, वीररसयुक्त, सकरुण शब्दरचना करणे हे एक प्रधान आंग आहे-कितीएक शब्दांच्या आंगी स्वभावसिद्धच असा धर्म असतो की, ते विविक्षित शब्दाजवळ व विविक्षित रसालाच भूषणभूत होतात. ते समजण्याला मार्मिकता व रसिकताच पाहिजे. कितीएक शब्द स्वभावगत्याच कर्णकटु असतात, ते निखालस वयं केले पाहिजेत. (३) यमकांची जुळणी, हेही एक काव्यांतील कर्णमाधुर्याचे साधन आहे. त्याचा तर संगीत शृंखळेत अगदीच लोप झाल्यासारखा दिसतो. ला, ली, ले, हे भूतकालचे प्रत्यय, किंवा तो, ती, ते हे वर्तमानकालचे प्रत्यय हे तर जणों काय त्याच्या पांचवीस पूजलेले! पण ही कवीची दुर्बलता होय. ह्यासाठी यमकें जुळविणे ती होतील तितकी निराळी असतील, तर त्यांची थोरवी विशेष. (४) -हस्वदीर्घाना पाहिजे तसें पिळून काढण्याबद्दल संगीत कवींनी जणों काय चरकाचाच अवतार घेतला आहे असे वाटते. 'निरंकुशः कवयः' हा नियम सरशहा लागू करणे अगदीं गैरशिस्त होय. होतां होईल तो त्यांचा सरळपणा कायम ठेविला पाहिजे. (५) यतिभंगदोष हाही अशाचपैकी एक होय. हा आलीकडील संगीत नाटकांतील बहुतेक नाटकांत आढळतो. तेथे एकादें अक्षर हळूच हाणून पूर्तता करावयाची हाही गौणपक्षच. (६) होतां होईल तो कोणतेही पद्य सरळ व सुबोध होण्याविषयी जपावे. रा. जोशी यांची अशीच लोकसेवा करण्याची उमेद आहे, ह्यास्तव त्यांना व इतर संगीत कवींनाही उपयोग व्हावा ह्मणून ह्या थोड्याशा सूचना केल्या आहेत. आतां प्रस्तुत पुस्तकांत घडलेले अशांपैकीच काही दोष दाखवून नंतर गुणांसंबंधे विचार करूं. कोणत्याही नाटकाला आधी संविधानक उत्तम पाहिजे. प्राचीन संविधानक घेतले तरी चिंता नाही. पण त्यांत काहीतरी सरसत्व किंवा मनोल्हादक चमस्कृति पाहिजे. नाही तर त्यापेक्षा नवीन कथानक रचावें तें बरें. 'मालविकाग्निमित्र' हे कालिदासाच्या नावाखाली मोडतें तरी, कालिदासकृत असावे असें विद्वान् लोक समजत नाहीत. ह्याचे कारण, त्यांत जितका हृदयंगमपणा असावा तितका दिसत नाही. इतकेच नव्हे तर कालिदासाच्या उदार अंतःकरणाला लवमात्रही शोभणार नाहीत, असे प्रसंग त्यांत बरेच दाखवून देता