या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २६३ येतील. तेव्हां संविधानकाच्या संबंधानेही ह्या नाटकाला विशेष मान देण्याजोगा आहे अशांतला अर्थ मुळीच नाही. तेव्हां आतां फक्त प्रस्तुत कवीने त्याला कसें काय स्वरूप दिले आहे येवढेच काय तें उरले. तेवढे पाहूं या. पण त्यांतही कवीची प्रशंसा करण्यासारखें असें फार करून काहीच नाही, असें मोठ्या दिलगिरीने ह्मणावे लागते. आधीं मुळी किर्लोस्करांच्या ज्या मनोल्हादक पदांच्या चालींवर ह्मणून जी ह्या नाटकांत पदें केली आहेत, ती मुळी त्या चालींवर-पाहिजे तर नीट रीतीने ह्मणा-पण हे सुद्धा कष्टानेच ह्मणावे लागतें-ह्मणतांच येत नाहीत. हा 'प्रथमग्रासे मक्षिकापात 'च समजला पाहिजे. उदाहरणार्थः " झाली ज्याची उपवर दुहितापमान ह्या प्रसिद्ध पदाच्या चालीवरचे पद. धारिणि देवि कथि मजला की, "जावे दाली संगीतालयीं ॥धृ०॥ नर्तन भेद छलिक ह्मणुनि तो, संप्रति शिकते मालविका ही ॥ शिक्षण घ्याया कसा जाइ तिस, अवगत होईल अथवा नाहीं ॥ है गणदासाचार्या पुसुनी, कळवीं गे मज तूं लवलाही' ॥ - वरचा सरळ व अनुभवसिद्ध रस्ता कोणीकडे, आणि ही व्हस्वदीर्घाना दडपून टाकणारी खडकाळ जमीन कोणीकडे ? हे पद वरच्या पदाच्या चालीवर कवी कसे काय ह्मणत असतील, ह्याविषयी आमची तर काही कल्पना चालत नाही. दुसरें तसेंच:--- "शशिकुलभूषण गुणवंता" ह्या चालीवरचें:- - नरनाथाचे विभवाला ॥ कोण साम्थता करूं शकला ? ॥धृ०॥ परिचित आहे नप मजला ॥ अगम्यही हा नच याला ॥ सन्निध याच्या जायाला ॥ वरि कैसा परि भीतीला ॥ गंभीर उद्धी तरण्याला ॥ दुस्तर तैसा मज गमला॥ १. प्रत्येक नाटककानें-निदान अपरिचित नाटकांतील तरी-प्रथमतः थोडक्यांत संविधानकें द्यावीत, अशी आमची सूचना आहे. कारण, त्याच्या योगाने वाचणारात पुढे चांगली मदत होते.