या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९९. २५५ पाय हत्तीचा, एक पाय वाघाचा, व एक पाय गायीचा लावून बिचाऱ्याला परीचाच अवतार करून सोडलें आहे ! 'मधी' 'मत्सुकुशलताअता' ही शब्दरत्ने तर बिनमोल असलेली कोणीही कबूल करील ! आणखी 'विवा-' व-'दी' ह्यांच्यामध्ये नमुन्याकरितां एक यतिभंग ! इतकें सरळ, शुद्ध, आणि सुबोध काव्य उतरल्यावर आणखी पाहिजे ते काय ? आतां दिडीचा एक मासलाःरूप आधीं सौंदर्यवान साचें ॥ वरी आभरणा ल्यालि सद्गुणांचे ।। दिला नखरा त्यावरी तिने छान ॥गमे निर्मी विधि गरलि कामबाण 'सौंदर्यवान' रूप! ल्यालि-हस्व; त्यावरी तिने छान नखरा दिला ! गरलि कामबाण ! अशा काय एक आणि दोन ? साऱ्याच पाहण्यासारख्या खुब्या ! 'प्रत्र' ह्या अक्षरांनी मागील अक्षरास द्वित्व येते, ह्याचे कवीस खानही पडलेले नाही. 'भूपवचाला' 'गुणनिपूणा' 'बोधिसे अंगुली मुद्रा' हा कवितादेवीचा पदविन्यास ! मनुष्य जे कष्ट सोसतो, ते अर्थ आणि कीर्ति मिळावी ह्मणून, कविसारख्यांना अर्थनिष्पत्ति कितपत होते, ह्याचा तर डंकाच वाजलेला आहे ! जेमतेम कृति छापून बाहेर पडली-तीही दुसऱ्याच्या सहाय्याने हो ! झणजे 'कृतकृत्यश्च भारत ' झाले. तेव्हां जिभळ्या चाटित बसावयाच्या त्या फक्त एका कीर्तीसाठी! ती, अशा दोषाच्या खिचडींत वाट्याला यावी कशी ? असो. आतां दोषांचाच अधिक पाल्हाळ लावून पुस्तककर्त्याचे धैर्य व उमेद खचवीत बसण्यांत काही अर्थ नाही, ह्याकरितां आतां गुणांकडे वळू या. सदरहू पुस्तकांत दोन पद्ये चांगली व सरळ अशी आझांस वाटतात, ती ही: पद "सुवर्णकेतकी " या चा०. सौदामिनिसम चमके कितितरी सडपातळ गमते मजला ॥ वर्तन गरुला शिष्यायोग्यचि कला तिये शिकवायाला ॥ध० ॥ कुरळ कचक सापाची कबरी पाहुनि उरगचि मज गमला ॥ भव्य भालपटलींची केशरचिरी देइ बहु शोभेला ॥ सौदा० ॥१॥ तसेच हीचे नयन लाजविति विमल अशाही पद्माला ॥ शरत्कालिंच्या पूर्णेदूसम शोभा विलसे वदनाला ॥ सौ० ॥२॥