या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. गुलाब रंगी सुमनासम की सुरंग नाजुक गाला ॥ नासिकचंपककळी दीपची अधरलालिने पवळ्याला ॥ सौ० ॥३॥ हे पद्य शृंगारात्मक आहे; "तिये दीपवी' 'चंपककळी' इत्यादि शब्दांची ओढाताण झाली आहे; तरी एकंदरीत सर्व पद्यांमध्ये हेच पद्य सरस आहे ह्यांत शंका नाही. ह्या पदाची ह्याच्या पुढील कडवी ही अशीच आहेत. दुसरें पद ह्याहून सरस असून त्याने शेवट गोड केला आहे. तें पद हैं: " जयदे जयदेवी" ह्या चा०.. सुखदा विमलपदा कुंदरदा कमलारमणा ॥ अखिल जीवना ॥ अंबुजधर नतभयहर कमललोचना ॥ धृ० ॥ भवदुस्तर तूं संहर तुजविण मज तारि कोण सांग वामना ॥ सुरनरमुनिवंदना ॥ अखिलजीवना ॥ अंबुजधर ॥१॥ ह्या पदांत खोड ठेवण्याला बहुधा जागा नाहींच झटले तरी चालेल. शिवाय त्याची जडणीही उत्तम कवीस शोभण्यासारखी आहे. पण अशी पद्ये प्रस्तुत पुस्तकांत आणखी किती सांपडतील, ह्याचा जबरदस्त संशय आहे. एकंदरीत कवीच्या आंगीं कवित्वशक्ति बऱ्याच प्रकारची आहे; लोकसेवा करण्याचा त्याचा उमेद आहे; आणि सर्वांत विशेष हें की. पुढील कृतीत आपली सुधारणा व्हावी अशी त्यांची बलवत्तर इच्छा आहे. तेव्हां त्यांस-व इतर संगीत कवींसही पूर्वी दिलेल्या सूचना बऱ्याच उपयोगी पडतील व त्या मनांत ठेवून काव्य केल्यास, ते ह्याहून अधिक लोकादरास पात्र होऊन कवीसही भूषणभूत होईल अशी आशा आहे. व तशा प्रकारची कृति पुनरपि आमच्यापुढे आल्यास, आझांसही अत्यंत संतोष वाटेल, येवढी प्रेमभावाने सूचना करून प्रस्तुत पुस्तककते रा. जोशी ह्यांचा आझी निरोप घेतो. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी भारद्वाजांच्या भ्रमाचा भोपळा. (पुढे चालू.) (ब) नामदेवाच्या अभंगावरून व चरित्रावरून त्याच्या काली मुसलमानांचे